Happy Birthday Paresh Rawal: ज्येष्ठ अभिनेते परेश रावल यांच्या हसमुखलाल ते बाबुराव पर्यंतच्या सर्वोत्कृष्ट लोकप्रिय विनोदी भूमिका, Watch Video
Happy Birthday Paresh Rawal (Photo Credits: File)

नायक, खलनायक आणि विनोदी कलाकार या तीनही भूमिका अगदी चोखपणे आणि सहजतेने निभावणारे बॉलिवूडचे लोकप्रिय कलाकार परेश रावल (Paresh Rawal) यांचा आज जन्मदिवस. परेश रावल यांचा जन्म 30 मे 1950 रोजी झाला. आज त्यांना 70 वर्षे पूर्ण झाली. 12 वर्षाचे असतानाच त्यांनी अभिनय क्षेत्रात जाण्याचे निश्चित केले होते. त्यासाठी त्यांनी प्रचंड मेहनतही केली. महाविद्यालयात नाटकातून आपल्या अभिनयाची छाप पाडणारे परेश रावल यांनी 'अर्जुन' या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर होली, नाम, अंदाज अपना अपना, यांसारख्या अनेक चित्रपट केले. मात्र हेराफेरी मधील त्यांच्या 'बाबुराव' (Baburao)या भूमिकेने त्यांनी लोकांच्या मनात घर केले आणि प्रसिद्धीच्या शिखरावर जाऊन पोहोचले.

परेश रावल यांच्या खलनायक भूमिका जितक्या गाजल्या तितक्याच त्यांच्या विनोदी भूमिकाही प्रचंड गाजल्या. बाबुराव, हसमुखलाल, गुंड्या भाई सारख्या गाजलेल्या भूमिका लोकांच्या आजही लक्षात आहेत.

पाहूया परेश रावल यांच्या '5' गाजलेल्या विनोदी भूमिका आणि डायलॉग्स

 हेराफेरी चित्रपटातील 'बाबुराव' 

जुदाई चित्रपटातील 'हसमुखलाल'

हेदेखील वाचा- वाईन शॉप बाहेर लांबच लांब रांगा लावलेल्या तळीरामांना ज्येष्ठ अभिनेते परेश रावल यांनी दिला मजेशीर सल्ला, पाहा ट्विट

आवारा पागल दिवाना चित्रपटातील 'मणिलाल'

हंगामा चित्रपटातील 'राधेशाम तिवारी'

चुप चुप के चित्रपटातील 'गुंड्या'

परेश रावल यांची पत्नी स्वारुप सैमपाट देखील बॉलिवूड मधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तसेच त्यांनी 'मिस इंडिया' चा खिताब देखील मिळाला आहे. परेश रावल सद्य स्थितीत गुजरातमधील भाजपचे नेते म्हणून कार्यरत आहेत.