माहिरा खान (फोटो सौजन्य-फेसबुक)

अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan) याच्या सोबत रईस (Raees) चित्रपटातून झळकलेली पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान (Mahira Khan) हिने मोदी सरकारने जम्मू-कश्मीर (Jammu-Kashmir) मधून हटवलेल्या कलम 370 आणि कलम 37 A वर एक वादग्रस्त ट्वीट केले आहे. या ट्वीटच्या माध्यमातून माहिरा हिने कश्मीरला एक खुले तुरुंग असून कश्मीरींना त्यामध्ये ठेवण्याचे विधान केले आहे.

माहिराच्या या ट्वीटला रिट्वीट करत असे म्हटले आहे की, जे लोक कश्मीर हे एक खुले तुरुंग असल्याचे संबोधत आहे त्यांनी एकदा तरी दृदयाच्या आत झाकून पहा. असे केल्यास कश्मीरींसाठी व्यक्त केल्या जाणाऱ्या चिंतेची झळ तुम्हाला जाणवेल.कश्मीर पुन्हा एकदा खुल्या तुरुंगासारखा झाला आहे.

त्याचसोबत अजून एक ट्वीट करत असे म्हटले आहे की, आम्ही सरळ मार्गाने काही गोष्टींचा हटविल्या आहेत ज्यामधून आम्हाला समाधान मिळत नाही. हा एक मातीवर रेष ओढल्यासारखे आहे. यामुळे सामान्य नागरिकांचे जीवन संपत चालले असून स्वर्ग जळत आहे आणि तरीही आम्ही शांत आहोत.(Jammu and Kashmir: कलम 370 हटविण्याच्या मुद्यावर काय म्हणतायत बॉलिवूडमधील हे कलाकार?)

माहिरा खान हिच्या बद्दल बोलायचे झाल्यास तिच्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर भरघोस कमाई केली नाही. मात्र माहिरा हिने केलेले विधान कश्मीर बद्दल तिला काय वाटते हे सांगून जाते. तसेच माहिरा खान हिचे नाव रणबीर कपूर सोबत जोडण्यात आले होते. या दोघांच्या नात्याबद्दल चर्चासु्द्धा रंगली होती. परंतु सध्या रणबीर आलिया भट्ट हिच्यासोबत नात्यात आहे.