Stampede During Premiere Pushpa 2 (फोटो सौजन्य - ANI)

Stampede During Premiere Pushpa 2: हैदराबादमध्ये अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' या चित्रपटाच्या प्रीमिअरदरम्यान चेंगराचेंगरीसारखी झाल्याची बातमी समोर आली आहे. यादरम्यान एका महिलेचा मृत्यू झाला असून अन्य दोन जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या सर्वत्र अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' या चित्रपटाची क्रेझ आहे. चित्रपटाचा प्रीमियर मध्यरात्री हैदराबादमध्ये आयोजित करण्यात आला होता. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना स्वतः हैदराबादच्या आरटीसी क्रॉस रोड येथील संध्या थिएटरमध्ये पोहोचले.

दरम्यान, यावेळी अल्लू अर्जून आणि रश्मिकाला पाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोक तेथे पोहोचले. अनियंत्रित जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला. या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला तर अन्य दोन जण जखमी झाले. (हेही वाचा -Pushpa 2 BTS Viral Video: पुष्पा 2 रिलीज होण्यापूर्वी, चाहत्यांना आश्चर्याचा धक्का, निर्मात्यांनी चित्रपटाचा BTS व्हिडिओ केला शेअर)

काय आहे संपूर्ण प्रकरण?

दिलसुखनगर येथे राहणारी रेवती तिचा पती भास्कर आणि दोन मुले श्री तेज (9) आणि सान्विका (7) यांच्यासोबत 'पुष्पा 2' चा प्रीमियर शो पाहण्यासाठी आली होती. गर्दी गेटमधून ढकलत असताना, रेवती आणि तिचा मुलगा श्री तेज बेशुद्ध पडले. घटनेची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, 'पीडित 39 वर्षीय महिला संध्या ही थिएटरमध्ये बेशुद्ध पडली होती आणि तिला उपचारासाठी दुर्गाबाई देशमुख रुग्णालयात आणण्यात आले. मात्र, तेथे पोहोचल्यावर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. (हेही वाचा - Pushpa 2 Peelings Song: 'पुष्पा 2' मधील 'पीलिंग्स' गाणे रिलीज, अल्लू-रश्मिकाची धमाकेदार केमिस्ट्री)

तथापी, त्यांचा मुलगा तेज जखमी झाला असून त्याला उपचारासाठी बेगमपेट येथील KIMS रुग्णालयात हलवण्यात आले. एका बालकासह अन्य जखमींची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. रेवतीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी दुर्गाबाई देशमुख रुग्णालयातून गांधी रुग्णालयात नेण्यात आला आहे.