World Bicycle Day दिनानिमित्त अभिनेत्री Kajol ने 'Kuch Kuch Hota Hai' मधील 'हा' मजेशीर व्हिडिओ शेअर करुन चाहत्यांना दिल्या शुभेच्छा
Kuch Kuch Hota Hai Scene (Photo Credits: Instagram)

आज जागतिक सायकल दिनानिमित्त  (World Bicycle Day) अनेकजण सायकलसोबतच्या आपल्या आठवणी शेअर करुन एकमेकांना या दिनाच्या शुभेच्छा देत आहे. या दिनाचे औचित्य साधून अभिनेत्री काजोलने (Kajol) एक मजेशीर व्हिडिओ शेअर करत हटके अंदाजात सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. तिने तिच्या बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केलेल्या 'कुछ कुछ होता है' (Kuch Kuch Hota Hai) चित्रपटातील सायकलसोबतचा एक मजेशीर सीन सोशल मिडियावर शेअर केला आहे. हा सीन 'ये लड़का है दिवाना' (Ye Ladka Hai Deewana) या गाण्यामधील आहे.

'कुछ कुछ होता है' चित्रपटातील 'ये लड़का है दिवाना' या गाण्याच्या शूटिंगवेळी काजोल सायकलवरुन धापकन जमिनीवर पडली होती. हा व्हिडिओ शेअर करुन तिने सर्वांना जागतिक सायकल दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.हेदेखील वाचा- DDLJ Returns in Maratha Mandir: शाहरुख खान-काजोल स्टारर 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' पुन्हा एकदा मराठा मंदिरात दाखल, आजपासून सुरु झाले स्क्रीनिंग

 

View this post on Instagram

 

A post shared by Kajol Devgan (@kajol)

हा व्हिडिओ पाहून दिग्दर्शक करण जौहर आणि फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रा यांनी देखील त्यावेळचा किस्सा शेअर करत आठवणींना उजाळा दिला आहे. “अरे देवा हे चांगलं लक्षात आहे आणि त्यानंतर काय झालं हे तर विसरूच शकत नाही.”अशी कमेंट करणने केलीय. तर फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राने देखील या व्हिडीओवर कमेंट केली आहे. “आठवतंय ..आम्ही सगळे लगेच तुझ्या दिशेने धावत आलो होतो. पण तू ज्या गाण्यांमध्ये पडली आहेस ती सगळी हीट झाली आहेत” अशी मेजेशीर कमेंट मनीषने केली आहे.

सायकलवरून पडल्यामुळे काजोलची तात्पुरती स्मृती गेली होती. काजोल सायकलिंगमध्ये अजिबात चांगली नाही असं शाहरुख खान एका मुलाखतीत म्हणाला होता. "आम्ही सायकल चालवताना हात मोकळे ठेवणं अपेक्षित होतं. पण काजोल अचानक चेहऱ्यावरच पडली. ती आमच्याकडे बघून हसू लागली. त्यामुळे मग सहाजिकच आम्ही देखील ती पडली म्हणून हसू लागलो." पुढे तो म्हणाला, “काजोलच्या पायाला खरचटलं होतं आणि तिला काही आठवतं नव्हत तेव्हा आम्ही थोडे गंभीर झालो. तिला काही काळासाठीचा स्मृतिभ्रंश झाला नशीबाने तिला अजय देवगण लक्षात होता.” असं म्हणत शाहरुखने मजेशीर प्रतिक्रिया दिली होती.