Matru Din 2020: 'मातृदिन' निमित्ताने बॉलिवुड अभिनेत्री हेमा मालिनी ने शेअर केले आईसोबतचे खास फोटो
हेमा मालिनी (PC - Twitter)

Matru Din 2020: आज सर्वत्र मातृदिन उत्साहात साजरा केला जात आहे. मातृदिनानिमित्त अनेकांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून आईसोबतचे फोटो शेअर केले आहेत. प्रसिद्ध बॉलिवुड अभिनेत्री हेमा मालिनी (Hema Malini) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून आईसोबतचे फोटो शेअर केले आहेत. हेमा मालिनी यांच्या चाहत्यांनी हे फोटो लाईक केले असून आपल्या प्रतिक्रियाही नोंदवल्या आहेत.

हेमा मालिनी यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये त्यांनी आई जया लक्ष्मी यांनी मिठी मारली आहे. या फोटोला हेमा मालिनी यांनी कॅप्शन दिली आहे. 'आज मदर्स डे आहे. एक असा दिवस ज्यावेळी आपण आपल्या आईच्या आठवणींना उजाळा देतो. तिचं प्रेम, तिचे कष्ट, मुलांचा सांभाळ करताना केलेली धावपळ या सर्वांची आठवणी पुन्हा एकदा जागवण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. माझ्या आईसोबतचा माझा हा फोटो माझ्यासाठी फार मौल्यवान आहे,' असंही हेमा मालिनी यांनी म्हटलं आहे. (हेही वाचा - मातृदिन 2020 चं औचित्य साधत सोनम कपूर, विक्की कौशल, सारा अली खान यांनी शेअर केले आई सोबतचे फोटोज; भावूक मेसेजसह व्यक्त केल्या आपल्या भावना)

याशिवाय हेमा मालिनी यांनी आपली मुलगी इशा देओल आणि अहाना देओलसोबतही काही जुने फोटो शेअर केले आहेत. दरम्यान, आज मदर्स डे निमित्त कलाविश्वातील अनेक कलाकारांनी आपल्या आईसोबतचे फोटो शेअर केले असून आईविषयीच्या भावना व्यक्त केल्या आहेत.