Aaradhya Birthday Special: अमिताभ-अभिषेक यांनी अशा दिल्या शुभेच्छा! (Photos)
अमिताभ बच्चन आणि आराध्या बच्चन ( Photo Credit-Instagram )

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची नात आराध्या बच्चन (Aaradhya Bachchan) हिचा आज सातवा वाढदिवस आहे. नातीच्या वाढदिवसानिमित्त भावूक झालेल्या अमिताभ यांनी तिच्यासाठी शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद दिले. अमिताभ बच्चन यांनी आपल्या ब्लॉगवर आराध्याचे काही फोटोज शेअर करत लिहिले की, "लहानग्या परीला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत, असा आशीर्वाद. आराध्य बच्चन, आमच्या घरासाठी एक आशीर्वाद आहे."

अभिषेकने (Abhishek Bachchan) देखील इंस्टाग्रामवर आराध्या आणि ऐश्वर्यासोबतचे पेटींग शेअर करत लिहिले की, "छोट्या राजकुमारीला वाढदिवसाच्या शुभेच्छा. तू आमच्या घराचा आनंद आणि अभिमान आहेस. तू कायम अशीच निरागस, प्रेमळ आणि हसरी रहा. मी अगदी मनापासून तुझ्यावर प्रेम करतो."

त्यानंतर अभिषेकने आराध्या आणि ऐश्वर्याचा फोटो शेअर करत आराध्याच्या जन्माबद्दल ऐश्वर्याचेही आभार मानले.

2007 मध्ये अभिषेक-ऐश्वर्या विवाहबद्ध झाले. त्यानंतर 2011 मध्ये आराध्याचा जन्म झाला. चाहते आराध्याला 'बेटी बी' असे संबोधतात.