Nora Fatehi Instagram: नोरा फतेहीचे इन्स्टाग्राम अकाउंट गायब, इंस्टाग्रामवर 37.6 दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स
अभिनेत्री नोरा फतेही (फोटो सौजन्य-इन्स्टाग्राम)

नोरा फतेहीच्या (Nora Fatehi) चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. दिवसभर इन्स्टाग्रामवर (Instagram) नोरा फतेहीचे फोटो तुम्ही पाहत असाल आता त्या नोराचे इन्स्टाग्राम अकाउंट सोशल मीडियावरून अचानक गायब (Instagram Account Blocked) झाले आहे. दुबईमध्ये व्हेकेशनचा आनंद लुटणाऱ्या नोरा फतेहीने काही तासांपूर्वीच तिचे सुंदर फोटो आणि व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केले होते. मात्र नोराचे अकाऊंट अचानक डिअ‍ॅक्टिव्हेट झाल्यामुळे तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. नोराचे इंस्टाग्रामवर 37.6 दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स होते. काही चाहत्यांचे म्हणणे आहे की कदाचित त्यांचे अकाऊंट हॅक झाले आहे, तर कोणी म्हणाले की इंस्टाग्रामने तिचे अंकाउट ब्लॉक केले असावे. नोराचे अचानक अंकाउट गायब होण्याचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

नोरा फतेही या दिवसांत दुबईमध्ये व्हेकेशन मोडमध्ये दिसली होती. नोराने तिच्या व्हेकेशनचे अनेक फोटो सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांसोबत सतत शेअर करत असते. कधी बिकिनीमध्ये तर कधी आपल्या ज्वलंत लूकने नोरा आपल्या लूकने लोकांना वेड लावत होती. अलीकडेच नोराने तिचे नवीन फोटो शेअर केले आहेत ज्यात ती व्हाईट लायनेसेससोबत बसलेली दिसत आहे. अशा परिस्थितीत, अकाउंट अचानक गायब होणे चाहत्यांना खूप त्रास झाला आहे. (हे ही वाचा Prithviraj: अक्षय कुमारच्या 'पृथ्वीराज' चित्रपटावर बंदी घालण्याची करणी सेनेची मागणी)

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, नुकताच नोरा फतेहीचा गुरू रंधावासोबतचा डान्स मेरी रानी म्युझिक व्हिडिओ रिलीज झाला आहे. हा व्हिडिओ खूप आवडला आहे. आतापर्यंत लाखो लोकांनी व्हिडिओ पाहिले आहे. नोरा प्रत्येक वेळी तिच्या डान्सने चाहत्यांना वेड लावते.