आपल्या नृत्याने प्रेक्षकांचे मनं जिंकणारी अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi) हीची अनेक गाणी हिट झाली आहेत. 'सत्यमेव जयते' (Satyamev Jayate) मधील 'दिलबर दिलबर' (Dilbar Dilbar) गाणे असो किंवा 'स्त्री' (Stree) सिनेमातील 'कमरिया' (Kamariya) हे आयटम सॉन्ग. ही गाणे सुपरहीट तर ठरलीच पण या गाण्यांनी अनेकांना ठेका धरायला भाग पाडले. बॉलिवूड सिनेमांनंतर आता नोरा मल्याळम सिनेमातही आपल्या नृत्याचा जलवा दाखवत आहे. सुपरहीट मल्याळम सिनेमातील डान्स व्हिडिओ तिने इंस्टावर शेअर केला आहे.
"साऊथच्या सुपरहिट सिनेमातील माझे सर्वात पहिले हिट मल्याळम सॉन्ग. अजून एका हिट सिनेमाचा भाग झाल्याने मी खूप खूश आहे," असे लिहित तिने हा व्हिडिओ शेअर केला आहे.
लवकरच नोरा फतेही अली अब्बास जफर दिग्दर्शित 'भारत' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येईल. या सिनेमात सलमान खान, कॅटरिना कैफ आणि दिशा पटानी यांसारखे कलाकाल प्रमुख भूमिकेत आहेत. याशिवाय जॉन अब्राहमच्या 'बाटला हाऊस' सिनेमातही नोरा झळकेल.