अभिनेत्री नूर मालाबिका दास हिचा मृतदेह 6 जून रोजी तिच्या मुंबईतील अपार्टमेंटमध्ये सापडला. 37 वर्षांची अभिनेत्री फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळून आली. पोलिसांनी लोखंडवाला येथील एका फ्लॅटमधून तिचा कुजलेला मृतदेह प्राप्त केला होता. तिने आत्महत्या केल्याचा प्राथमिक संशय आहे. तिच्या अपार्टमेंटमधून दुर्गंधी येत असल्याची माहिती तिच्या शेजाऱ्यांनी ओशिवरा पोलिस स्टेशनला दिल्यानंतर तिचा मृतदेह सापडला. या मृत्यू प्रकरणी ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून तिच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

पाहा पोस्ट -

ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अभिनेत्री नूर मालाबिका दासच्या आत्महत्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करत आहे. तिच्या मृत्यूप्रकरणाचा तपास खूनाच्या शक्यतेतूनही केला जावा, असं त्यांनी म्हटलं आहे. “महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशन तुम्हाला विनंती करत आहे की अभिनेत्री नूर मालाबिका दास हिच्या आत्महत्या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करण्यात यावा.

बॉलीवूडमध्ये अशा दुःखद घटना वारंवार घडत आहेत, त्यामुळे यामागच्या मूळ कारणांचा सखोल तपास करणं आवश्यक असल्याचे असोशिएशनने म्हटले आहे.