प्रसिद्ध दिग्दर्शक निशिकांत कामत (Nishikant Kamat) यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले आहे. गेल्या काही काळापासून ते प्रकृती अस्वास्थ्याने त्रस्त आहेत. निशिकांत कामत हे लीव्हर सीरोसिस आजाराने त्रस्त आहेत. त्यामुळे काही दिवसांपूर्वीच त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्या आले आहे. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. त्यांची प्रकृती सातत्याने चिंताजनक होत चालल्याच वृत्त आहे. आज अचानक त्यांची प्रकृती अधिकच चिंताजनक असल्याचे वृत्त आले. मात्र, निशिंकात यांच्या अत्यंत निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या लोकांकडून सोशल मीडियावर त्यांच्या निधनाबाबत ट्विट करण्यात आले आणि अफवांना उधान आले. मात्र निशिकांत यांच्यावर उपचार सुरु असून सध्या त्यांना व्हेंटीलटरवर ठेवण्यात आले आहे.
निशिकांत कामत यांनी आपल्या करिअरची सुरुवात मराठी चित्रपटसृष्टीतून केली होती. मुंबईतील रुईया कॉलेजमधून कामत यांची कारकीर्द बहरत गेली. डोंबिवली फास्ट हा त्यांनी दिग्दर्शित केले त्यांच्या कारकिर्दितील पहिला सिनेमा. कामत यांच्या डोंबिवली फास्ट या पहिल्याच सिनेमाला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता. पुढे त्यांनी दृश्यम, मदारी, लै भारी यांसारखे अनेक महत्त्वपूर्ण चित्रपट दिले. निशिकांत कामत हे पूर्णपणे मराठमोळे व्यक्तिमत्व होते.
Sadly the end seems inevitable anytime soon. But as of now Nishikant is still on ventilator https://t.co/PfblBbEXQG
— Milap (@zmilap) August 17, 2020
Nishikant kamat is on ventilator support. He is still alive & fighting. Let’s pray for him.
— Riteish Deshmukh (@Riteishd) August 17, 2020
निशिकांत कामत यांच्या निधनाचे वृत्त Milap Zaveri यांनी ट्विटरद्वारे दिले आहे. मात्र, थोड्याच वेळात मिलाप झवेरी यांनी आपल्या ट्विटची दुरुस्थी करत म्हटले आहे की, निशिकांत यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले आहे. मिलाप झवेरी हे प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक आहेत. ते निशिंकात कामत यांचे अत्यंत निटकवर्तीय म्हणून ओळखले जातात. आपल्या ट्विटर पोस्टमध्ये मिलाप यांनी म्हटले आहे की, ''निशिकांत कामत यांचे निधन झाल्याची हृदयद्रावक बातमी आहे. जयहींद महाविद्यालयात झालेल्या नाट्यस्पर्धेत माझ्या पहिल्या नाटकाचा पहिला परिक्षक होता. या नाटकात मला सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि लेखक म्हणून गौरविले गौरविण्यात आले होते.
Heartbreaking news that Nishikant Kamat passed away. He judged My 1st play ever in Jaihind College where he awarded me best actor and writer. He was gonna direct “Sanak” written by @shiekhspear and me, starring @juniorbachchan Sadly the film didn’t happen. Will miss him 💔
— Milap (@zmilap) August 17, 2020
दरम्यान, निशिंकात कामत यांच्याबाबत चला हवा येऊ द्या फेम निलेश साबळे यांनीही दुख: व्यक्त केले आहे. निशिकांत यांचा सहावास हा एक खास अनुभव असायचा अशी भावना साबळे यांनी व्यक्त केली आहे.