Bachchan Pandey: 'बच्चन पांडे' चित्रपटाचे नवीन पोस्टर रिलीज, अक्षय कुमारचा चेहरा पाहून वाटेल भीती, See Poster
Bachchan Pandey New Poster (PC - Instagram)

Bachchan Pandey: बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार (Akshay Kumar) पुन्हा एकदा त्याचा चित्रपट मोठ्या पडद्यावर घेऊन येत आहे. या चित्रपटाचे नाव बच्चन पांडे आहे. या चित्रपटाची बऱ्याच दिवसांपासून चर्चा होती, मात्र कोरोनामुळे चित्रपट सतत पुढे ढकलला जात होता. अशा परिस्थितीत अक्षयने त्याच्या आगामी 'बच्चन पांडे' या चित्रपटाच्या ट्रेलरची तारीख जाहीर केली आहे आणि एक धमाकेदार पोस्टरही शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये अक्षयचा लूक भीतीदायक दिसत आहे. हा चित्रपट 18 मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

अक्षय कुमारने नवीन लूक पोस्टरसह चित्रपटाच्या ट्रेलरची माहिती शेअर केली आहे. अक्षयने लिहिलं आहे की, 'हे एक पात्र आहे, ज्याला पेंट शॉपपेक्षा अधिक छटा दिसतील. बच्चन पांडे तुम्हाला घाबरवायला, हसायला आणि रडायला तयार आहे. कृपया त्याला तुमचे प्रेम द्या, 18 फेब्रुवारीला ट्रेलर येत आहे.' अक्षयने शेअर केलेल्या पोस्टरवर बच्चन पांडेच्या इंग्रजी शीर्षकाचे स्पेलिंग बदललेले दिसते. पोस्टरवर अक्षय कुमारचा लूक खरोखरच भयानक आहे. तसेच पोस्टरवर असं ​​लिहलं आहे की, 'मला भाऊ नाही, गॉडफादर बोलतात'. (वाचा - Love Hostel Trailer: 'लव्ह हॉस्टेल'चा ट्रेलर रिलीज, पहिल्यांदाच खतरनाक अंदाजात दिसले Vikrant Massey; पहा व्हिडिओ)

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

अक्षयने या चित्रपटात एका गँगस्टरची भूमिका साकारली असून यात क्रिती सेनन आणि जॅकलीन फर्नांडिस मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट 18 मार्चला होळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाची कथा एका गँगस्टरवर आधारित आहे. ज्याला अभिनेता व्हायचे आहे. निश्चय कुतांडा यांनी या चित्रपटाचे लेखन केले असून फरहाद सामजी यांनी दिग्दर्शन केले आहे. यापूर्वी हा चित्रपट गेल्या वर्षी ख्रिसमसच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार होता.परंतु, नंतर कोविडच्या वाढत्या प्रकरणांमुळे चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले.