बॉलिवूड गायिका नेहा कक्कर (Neha Kakkar) लग्नापासून बरीच चर्चेत राहिली आहे. आजकाल ती टीव्ही रियलिटी शो ‘इंडियन आयडल’मध्ये जजची भूमिका पार पाडत आहे. आता नेहाने तिच्या कारकिर्दीत आणखी एक मोठी कामगिरी केली आहे. यूट्यूबकडून नेहाला डायमंड पुरस्कार (YouTube Diamond Award) मिळाला आहे. यूट्यूबकडून हा पुरस्कार मिळविणारी नेहा ही पहिली भारतीय सिंगर ठरली आहे. नेहाने सोशल मीडियावर ही माहिती देत आनंद व्यक्त केला आहे. यासोबतच तिने तिचे कुटुंबीय आणि चाहत्यांसाठी एक खास संदेश लिहिला आहे.
नेहा कक्करने आपल्या डायमंड पुरस्कारासह फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये हा पुरस्कार मिळाल्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे. यासोबत नेहाने लिहिले आहे, ‘युट्यूबचा डायमंड पुरस्कार प्राप्त करणारी भारतातील पहिली गायिका. माझ्या कुटुंबाच्या पाठिंब्याशिवाय हे सर्व घडले नसते. यासाठी आई, बाबा, टोनी भाई, सोनू दीदी आणि आपणा सर्वांचे मी आभार मानू इच्छिते. तुम्हा सर्वांना माझे प्रेम. Youtube India धन्यवाद. माझ्या #NeHearts विशेष आभार. कुटुंबातील नवीन सदस्य रोहनप्रीतसिंह खूप प्रेम.’ (हेही वाचा: अमृता फडणवीस यांचं नवं गाणं; 'अंधार' सिनेमासाठी गायले Jazz song (Watch Video)
View this post on Instagram
युट्यूबकडून मिळालेला हा डायमंड पुरस्कार उघडतानाचा एक व्हिडीओही नेहाने शेअर केला आहे. नेहाच्या अचिव्हमेंटबद्दल रोहनप्रीतशिवाय अवनीत कौर, गौहर खान यांच्यासह अनेक सेलेब्ज आणि चाहत्यांनी तिचे अभिनंदन केले आहे. दरम्यान, नेहा सध्या इंडियन आयडल 12 ची जज आहे. तिच्यासोबत विशाल दादलानी आणि हिमेश रेशमियाही हा शो जज करत आहेत. गेल्या वर्षी पंजाबी गायक रोहनप्रीत सिंहसोबत लग्न केल्याची घोषणा करत नेहाने सर्वांनाच धक्का दिला होता. नेहाचे लग्नही चर्चेत होते. नेहाने तिच्या लग्नाचा प्रत्येक अपडेट फोटो आणि व्हिडिओंच्या माध्यमातून सोशल मिडियावर शेअर केला होता.