Amruta Fadnavis New Song (Photo Credits: Youtube)

माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांचं नवं गाणं रिलीज झालं आहे. 'अंधार' (Andhaar) या मराठी सिनेमासाठी त्यांनी हे गाणं गायलं असून जीत गांगुली (Jeet Gannguli) यांनी संगीतबद्ध केलं आहे. 'डाव मांडते भीती' असे या गाण्याचे बोल आहेत. गाण्याचा व्हिडिओ खुद्द अमृता फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना त्यांनी लिहिले की, "माझे नवे जॅझ सॉन्ग सादर करत आहे. झी म्युझिक मराठीच्या सेपेन्स थ्रीलर सिनेमा अंधार यातील हे गाणे नक्की ऐका."

गाण्याच्या व्हिडिओत आपल्याला अनेक थ्रीलर घटना पाहायला मिळतात. तसंच अमृता फडणवीस गाणे गाताना दिसत आहेत. 'अंधार' या सिनेमात सागरिका घाटगे आणि गुलशन देवये यांच्या प्रमुख भूमिका आहेत. (TILA JAGU DYA: तिला जगू द्या! मंत्री यशोमती ठाकुर यांना आवडला अमृता फडणवीस यांच्या गाण्यातील आशय)

अमृता फडणवीस ट्विट:

यापूर्वी देखील अमृता फडणवीस यांची काही गाणी रिलीज झाली आहेत. अमृता यांना त्यांच्या गायनामुळे अनेकदा ट्रोलिंगला सामोरे जावे लागते. मात्र भाऊबीजेच्या मुहूर्तावर सादर केलेले तिला जगू द्या गाण्याला रसिकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळाला. मात्र यावर महेश टिळेकर यांनी 'हिला नको गाऊ द्या' म्हणत उघडपणे टीका केली होती. दरम्यान, केवळ आपल्या गायन कौशल्याने नाहीतर विरोधकांवर टीका करण्यासाठी देखील त्या ओळखल्या जातात.