अर्जुन रामपाल (Image Credit: Instagram)

Drugs Case: अभिनेता अर्जुन रामपाल (Arjun Rampal) च्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने (Narcotics Control Bureau) आता अभिनेता अर्जुन रामपालच्या बहिणीला ड्रग्ज प्रकरणी समन्स बजावलं आहे. तिला आज 11 वाजेपर्यंत चौकशीसाठी बोलविण्यात आलं आहे. मीडिया रिपोर्टनुसार कोमल रामपाल यांना आज एनसीबीने समन्स बजावले आहे. यामुळे अर्जुन रामपालच्या अडचणीच आणखी वाढ होण्याची शकता आहे.

बॉलिवूडमध्ये पसरलेले ड्रग्जचे जाळे शोधण्यासाठी एनसीबी सतत चौकशी करत आहे. या प्रकरणी एनसीबीकडून अर्जुन रामपालची अनेकदा चौकशी करण्यात आली आहे. 21 डिसेंबर रोजी एनसीबीने अर्जुन रामपालची चौकशी केली होती. या प्रकरणी अर्जुनची मैत्रीण गॅब्रियलचीदेखील एनसीबीने चौकशी केली आहे. (वाचा - Deepika Padukone Birthday: दीपिका पादुकोण हिने वाढदिवसादिवशी व्हिडिओच्या माध्यमातून शेअर केला आपला आतापर्यंतचा अविश्वनीय प्रवास , Watch Video)

त्यानंतर आता अर्जुन रामपालच्या बहिणीचीही चौकशी केली जाणार आहे. ज्यासाठी तिला आज हजर राहावे लागणार आहे. नोव्हेंबरमध्ये एनसीबीने अर्जुन रामपालच्या घरी छापा टाकला होता. यावेळी त्याच्या घरातून बंदी घातलेली औषधे सापडली. त्यामुळे अर्जुन रामपाल यांना एनसीबी कार्यालयात दोनदा चौकशीसाठी बोलावण्यात आलं. त्यानंतर अर्जुन रामपालने आपल्याला संशयावरून चौकशीसाठी बोलावण्यात आलं असून आपल्यावरील सर्व आरोप निराधार असल्याचं म्हटलं आहे.

ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने अर्जुन रामपालच्या मैत्रिणीचा भाऊ एगीसियालोस डेमीट्रिएड्स याला अटक केली होती. त्यानंतर अर्जुनचे नाव समोर आले होते. सध्या, एगीसियालोस डेमीट्रिएड्स ला कोर्टाने जामीन मंजूर केला आहे.