Deepika Padukone Birthday: दीपिका पादुकोण हिने वाढदिवसादिवशी व्हिडिओच्या माध्यमातून शेअर केला आपला आतापर्यंतचा अविश्वनीय प्रवास , Watch Video

या व्हिडिओमध्ये दीपिकाचे जन्मल्यापासून, शाळेपासून ते एक मॉडल बनण्यापर्यंतचे सुंदर फोटोज शेअर केले आहेत. काही मिनिटांतच या व्हिडिओला 6 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

Deepika Padukone Birthday: दीपिका पादुकोण हिने वाढदिवसादिवशी व्हिडिओच्या माध्यमातून शेअर केला आपला आतापर्यंतचा अविश्वनीय प्रवास , Watch Video
Deepika Padukone Video (PhotoCredits: Instagram)

बॉलिवूडची मस्तानी, लीला दीपिका पादुकोण (Deepika Padukone) हिचा आज 35 वा वाढदिवस... फराह खान दिग्दर्शित ओम शांति ओम या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यामुळे तिचे सौंदर्य, तिच्या गालावर पडणा-या गोड खळीने सर्वांनाच घायाळ केले. तिचा ओम शांति ओम ते छपाक पर्यंतचा प्रवास हा खरंच थक्क करणारा आहे. तिच्यासाठी देखील हा प्रवास म्हणावा तितका सोपा नव्हता. मात्र त्याने अनेक गोष्टींवर मात करत आज ती यशाच्या शिखरावर पोहोचली आहे. मात्र हे सर्व करताना दीपिकाचे बालपण देखील तितकेच सुंदर आणि गोड होते. म्हणून दीपिकाने स्वत: आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आपला बालपणापासूनचा ते आतापर्यंतचा प्रवास फोटोजचा छान व्हिडिओ बनवून शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये दीपिकाचे जन्मल्यापासून, शाळेपासून ते एक मॉडल बनण्यापर्यंतचे सुंदर फोटोज शेअर केले आहेत. काही मिनिटांतच या व्हिडिओला 6 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. हेदेखील वाचा- Deepika Padukone ची Athens च्या विमानतळावर लावण्यात आली प्रतिमा, 'प्रामाणिक हास्य' असलेल्या दिग्गजांच्या यादीत दिपिकाची वर्णी

 

View this post on Instagram

 

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone)

"हा व्हिडिओखाली हा प्रवास खूपच अविश्वसनीय होता. त्यासाठी मी माझे कुटूंब, मित्र आणि तुम्हा सर्वांचे मनापासून आभार मानते" असे लिहिले आहे.

अलीकडेच दीपिका ड्रग्ज प्रकरणात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. मात्र यात तिचे कुटूंब आणि विशेष करुन तिच्या नव-याने अभिनेता रणवीर सिंह ने भक्कम आधार दिला. ज्यामुळे यातून ती बाहेर पडू शकली.

दीपिकाच्या कामाविषयी बोलायचे झाले तर ती 'छपाक' या चित्रपटात शेवटची दिसली होती. सध्या ती शकुन बत्राच्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. यात चित्रपटात तिच्यासोबत सिद्धांत चतुर्वेदी आणि अनन्या पांडे मुख्य भूमिकेत दिसतील.

(The above story first appeared on LatestLY on Jan 05, 2021 07:59 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).