Deepika Padukone ची Athens च्या विमानतळावर लावण्यात आली प्रतिमा, 'प्रामाणिक हास्य' असलेल्या दिग्गजांच्या यादीत दिपिकाची वर्णी

एथेंसच्या विमानतळावर निवडक दिग्गज लोकांचा हसतानाचा फोटो लावण्यात आला आहे. या लोकांच्या हास्याला 'प्रामाणिक हास्य' म्हणून गौरविण्यात आले आहे. यात दीपिका पादुकोण हिची वर्णी लागली असून तिचा सुद्धा एक सुंदर फोटो लावण्यात आला आहे.

Deepika Padukone ची Athens च्या विमानतळावर लावण्यात आली प्रतिमा, 'प्रामाणिक हास्य' असलेल्या दिग्गजांच्या यादीत दिपिकाची वर्णी
Deepika Padukone (Photo Credits: Instagram)

'ओम शांति ओम' या पहिल्या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर आलेली आणि आपल्या स्मित हास्य आणि गालावर पडलेल्या खळीने लाखो लोकांची मनं जिंकणारी अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) हिचे जगभरात देखील असंख्य चाहते आहेत. तिथे तिचा स्वत:चा असा एक चाहतावर्ग असून त्याची प्रचिती तिच्या सध्या घडलेल्या एका प्रसंगावरुन येतेय. एथेंस देशाच्या विमानतळावर (Athens Airport) दिपिका पादुकोणच्या एका सुंदर प्रतिमेचा फोटो लावला आहे. यात तिचे स्मित हास्य अनेकांची मने जिंकत आहे. या एअरपोर्टवर तिच्यासह जगभरातील अशा दिग्गजांचा फोटो लावण्यात आला आहे ज्यांना प्रामाणिक हास्य म्हणून निवडण्यात आले आहे.

एथेंसच्या विमानतळावर निवडक दिग्गज लोकांचा हसतानाचा फोटो लावण्यात आला आहे. या लोकांच्या हास्याला 'प्रामाणिक हास्य' म्हणून गौरविण्यात आले आहे. यात दीपिका पादुकोण हिची वर्णी लागली असून तिचा सुद्धा एक सुंदर फोटो लावण्यात आला आहे.हेदेखील वाचा- Salman Khan चा 'Antim' चित्रपटातील फर्स्ट लूक आला समोर, मेहुणा आयुष शर्मा ने शेअर केला 'हा' व्हिडिओ

या फोटोखाली त्या व्यक्तीचे नाव लिहिलेले नाही. प्रत्येक प्रतिमेखाली त्या व्यक्तीचा व्यवसाय आणि देशाचे नाव लिहिले आहे. एथेन्सच्या विमानतळावर ही प्रतिमा पाहिल्यानंतर दीपिकाच्या कुणा चाहत्याने हा फोटो काढून तो सोशल मिडियावर शेअर केला आहे. हा फोटो सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

दिपिकाच्या कामाविषयी बोलायचे झाले तर ती 'छपाक' या चित्रपटात शेवटची दिसली होती. सध्या ती शकुन बत्राच्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. यात चित्रपटात तिच्यासोबत सिद्धांत चतुर्वेदी आणि अनन्या पांडे मुख्य भूमिकेत दिसतील.

(The above story first appeared on LatestLY on Dec 10, 2020 12:26 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).