Narendranath Razdan Passes Away: आलिया भट्टचे आजोबा नरेंद्रनाथ राजदान यांचे 94 व्या वर्षी निधन झाले
Narendranath Razdan Passes Away (Photo Credits: Instagram)

Alia Bhatt's Grandfather Passes Away: नरेंद्रनाथ राजदान (Narendranath Razdan) यांचे निधन झाले आहे. ते 94 वर्षांचे होते. नरेंद्रनाथ राजदान हे विर्तमानातील बहुचर्चीत अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) हिचे आजोबा होत. मुंबई येथे गुरुवारी (1 जून) त्यानी अखेरचा श्वास घेतला. राजदान यांना फुफ्फुसाचा गंभीर संसर्ग झाला होता. ब्रिच कँडी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पाठिमागील प्रदीर्घ काळापासून ते प्रकृतीअस्वास्थ्याने त्रस्त होते.

राजदान यांना फुफ्फुसाचा संसर्ग वाढल्यानंतर रुग्णालयातील अतिदक्षता विभागात (ICU) ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, त्यांच्या शरीराने उपचाराला म्हणावा तसा प्रतिसाद दिला नाही. अखेर त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

ट्विट

 

View this post on Instagram

 

A post shared by Alia Bhatt 💛 (@aliaabhatt)

दरम्यान, नरेंद्रनाथ राजदान यांच्य 92 व्या वाढदिवसा निमित्त अलिया भट्ट हिने इन्स्टाग्रामवर एक रिल्स शेअर केले होते. तिने त्यांच्या पोस्टला कॅप्शन देत 'माझे आजोबा. माझा हिरो (हृदय इमोजी). 93 पर्यंत गोल्फ खेळला. 93 पर्यंत काम केले. सर्वोत्कृष्ट ऑम्लेट बनवले. सर्वोत्तम कथा सांगितल्या. व्हायोलिन वाजवले. आपल्या नातवासोबत खेळले. त्याचे क्रिकेट आवडते. आवडले. त्याचे स्केचिंग. त्याच्या कुटुंबावर प्रेम केले आणि अगदी शेवटच्या क्षणापर्यंत.. त्याच्या आयुष्यावर प्रेम केले!', असे भावनेने ओतप्रोत भरलेले शब्द वापरले होते. (हेही वाचा, Filmfare Awards 2023 Winners: मुंबईत 68 वा फिल्मफेअर पुरस्कार सोहळा संपन्न, संजय लीला भन्साळी यांच्या गंगूबाई काठियावाडीने जिंकले 10 पुरस्कार, जाणून घ्या विजेत्यांची संपूर्ण यादी)

ट्विट

 

View this post on Instagram

 

A post shared by Alia Bhatt 💛 (@aliaabhatt)

आलियाची आई सोनी राजदान हिनेही तिच्या वडिलांच्या निधनाची दुर्दैवी बातमी सोशल मीडियावर शेअर केली. तिने सोशल मीडियावर लिहिले, 'बाबा, आजोबा, निंदी - आम्ही तुम्हाला आमचे म्हणून बोलावले याबद्दल आम्ही देवाचे खूप आभारी आहोत.