Mohammed Zahir Hashmi (Photo Credits: IANS)

बॉलिवूडचे ज्येष्ठ संगीतकार खय्याम यांनी काल रात्री ( 19 ऑगस्ट) मुंबईच्या सुजॉय हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला. रात्री 9.30 च्या सुमारास लंग इन्फेक्शनवर उपचार घेणार्‍या खय्याम (Khayyam) यांचा कार्डीएक अरेस्टच्या धक्क्याने निधन झाले. आज मुंबईतील जुहू येथे त्याच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी चाहत्यांची गर्दी होती. आज शासकीय इतमामामध्ये त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले आहेत.

16 ऑगस्ट पासून खय्याम यांची प्रकृती खालावली होती. त्यांच्यावर मागील 21 दिवसांपासून उपचार सुरू होते. मात्र हे लंग इंफेक्शन गंभीर स्वरूपाचं असल्याचं सांगण्यात आलं होतं. अखेर वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला.

ANI Tweet

खय्याम यांच्या निधनाचं वृत्त समजताच बॉलिवूडसह त्यांच्या चाहत्यांनी हळहळ व्यक्त केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, लता मंगेशकरांनी ट्वीटरच्या माध्यमातून श्रद्धांजली अर्पण केली. तर अन्नू मलिक, सोनू निगम सह अनेक कलाकारांनी खय्याम यांच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन घेतलं. खय्याम यांना पद्मभूषण या पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे.