Bajrangi Bhaijaan मधील मुन्नीने सोशल मिडियावर शेअर केला आपला डान्स व्हिडिओ, चाहते म्हणाले 'किती मोठी झाली'
Harshali Malhotra (Photo Credits: Instagram)

'बजरंगी भाईजान' या चित्रपटात मुन्नी हे पात्र साकारणारी हर्षाली मल्होत्रा (Harshali Malhotra) सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. बजरंगी भाईजान या चित्रपटानंतर एकाएकी गायब झालेली हर्षाली सोशल मिडियाद्वारे आपल्या चाहत्यांशी जोडलेली आहे. नुकताच तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तिचा एक डान्स व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तिचा अवतार पाहून 'मुन्नी किती मोठी झाली' अशी प्रतिक्रिया तिच्या चाहत्यांनी दिली आहे. या व्हिडिओमध्ये सलमानसोबत झळकलेली छोटी मुन्नी खूपच मोठी झालेली दिसत आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये हर्षाली करीना कपूरच्या चमेली चित्रपटातील गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडिओ हर्षालीच्या चाहत्यांना प्रचंड आवडला आहे.हेदेखील वाचा- Radhe Title Track Out: सलमान खानच्या 'राधे' सिनेमाचं टायटल ट्रॅक आलं रसिकांच्या भेटीला (Watch Video)

पाहा हर्षाली चा व्हायरल व्हिडिओ

या व्हिडिओमध्ये हर्षालीचे मोठे केस आणि तिची उंची पाहून 'मुन्नी किती मोठी झाली' अशी प्रतिक्रिया यूजर्सने दिली आहे. तसेच तिच्या या व्हिडिओ चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

हर्षाली मल्होत्रा 2014 मध्ये बजरंगी भाईजान या चित्रपटात सलमान खानसोबत दिसली होती. मात्र त्यानंतर ती कोणत्याच चित्रपटात दिसली नाही.

दरम्यान सलमान खान (Salman Khan) चा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘राधे: योर मोस्ट वॉन्टेड भाई’ 13 मे रोजी रिलीज होणार आहे. अशा परिस्थितीत चित्रपटाचे अ‍ॅडव्हान्स बुकिंग सुरू झाले आहे. एसके फिल्म्सने यासंदर्भात इन्स्टाग्रामवर एक पोस्टर शेअर करत माहिती दिली आहे. एसके फिल्म्सने आपल्या अधिकृत इन्स्टाग्रामवर एक पोस्टर शेअर केली आहे, ज्यामध्ये त्यांनी सांगितले आहे की, राधे या चित्रपटासाठी मीडिल ईस्टसाठी अ‍ॅडव्हान्स बुकिंग सुरू करण्यात आले आहे. युएई, कतार, कुवैत, सौदी अरेबिया आणि बहरीनसाठी अ‍ॅडव्हान्स बुकिंग सुरू झाले आहे. सलमान खानच्या चित्रपटाचे अ‍ॅडव्हान्स बुकिंग सुरू झाले आहे! आपण व्हॉक्स सिनेमा, नोव्हो सिनेमा, रील सिनेमा आणि स्टार सिनेमा सारख्या स्थानिक सिनेमा वेबसाइटवरून आपले बुकिंग करू शकता.