
आमिर खानचा (Aamir Khan) स्पॉटबॉय अमोस पॉल (Amos) याचं काल (12 मे ) दिवशी मुंबईमध्ये हृद्यविकाराच्या धक्क्याने निधन झाले आहे. अमोस याने आमिर खान सोबतच राणी मुखर्जी सोबतदेखील काम केले आहे. आज आमोसच्या पार्थिवावर मुंबईमधील शिवडी येथील स्मशानभूमीत अंतिम संस्कार झाले. त्यावेळेस त्याचे अंतिम दर्शन घेण्यासाठी बॉलिवूड कलाकार उपस्थित होते. मुंबईमध्ये सध्या लॉकडाऊन दरम्यान कडक संचारबंदी आहे. अशा परिस्थितीमध्येही अभिनेता आमिर खान, पत्नी किरण राव (Kiran Rao), अभिनेत्री राणी मुखर्जी पोहचली होती. दरम्यान त्यांचे काही फोटोज सोशल मीडियामधून समोर आले आहेत. आमीर खान आणि त्याच्या पत्नीने आमोसच्या कुटुंबाचं सांत्वन केले.



बॉलिवूड आणि सिनेसृष्टीच्या दृष्टीने मागील काही दिवस खरंच क्लेषकारक आहेत. एकीकडे कोरोना व्हायरस संकटामध्ये सकारात्मकता ठेवण्यासाठी आणि हे संकट दूर सारून पुन्हा निर्धास्तपणे बाहेर पडण्याची स्वप्न पाहणार्या बॉलिवूडकरांना मागील काही दिवसात अनेक कलाकारांच्या अकाली एक्झिटमुळे धक्का बसला आहे.