Mission Mangal New Trailer: अशक्य मिशन शक्य करुन दाखवणारा 'मिशन मंगल' सिनेमाचा नवा ट्रेलर प्रदर्शित! (Watch Video)
Mission Mangal New Trailer (Photo Credits: YouTube)

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो) च्या शास्त्रज्ञांचे अपार कष्ट आणि अद्वितीय मेहनतीचा प्रत्यय देणारा आणि सत्य कथेवर आधारीत नवा सिनेमा 'मिशन मंगल' (Mission Managal) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यापूर्वी या सिनेमाचा एक ट्रेलर प्रदर्शित झाला होता. त्यात आपल्याला अक्षय कुमार, विद्या बालन, तापसी पन्नू, शर्मन जोशी, सोनाक्षी सिन्हा या कलाकारांची झलक पाहायला मिळाली होती. आज प्रदर्शित झालेला नवा ट्रेलर राकेश धवन यांच्यावर केंद्रीत आहे. Mission Mangal Trailer: भारताला मंगळापर्यंत घेऊन जाण्याचा अवघड आणि अशक्य प्रवास उलघडणारा 'मिशन मंगल' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित! (Watch Video)

2 मिनिटांचा हा ट्रेलर अतिशय रंजक असून भारतीय शास्त्रज्ञांच्या जीवतोड मेहनतीचा प्रत्यय यात येतो. एकदा मिशन अयशस्वी झाल्यानंतर कुठेही हार न मानता ज्या जिद्दीने आणि जोमाने शास्त्रज्ञ पुन्हा प्रयत्न करतात, ते या ट्रेलरमधून पाहायला मिळते.

7 वेळा अपयशी ठरुनही आठव्यांदा प्रयत्न करणाऱ्या आणि कधीही हार न मानणाऱ्या शास्त्रज्ञाच्या जिद्दीची कहाणी असं म्हणत अक्षय कुमार याने हा ट्रेलर शेअर केला आहे.

अक्षय कुमार ट्विट:

'मिशन मंगल नवा ट्रेलर:

हे अवघड मिशन पूर्ण करण्यासाठी इस्त्रोमधील 17 इंजिनियर्स आणि शास्त्रज्ञांची टीम कार्यरत होती. महिला शास्त्रज्ञांनी देखील घर आणि काम अशी दुहेरी जबाबदारी अगदी लिलया पार पाडली.

एस. शंकर यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले असून 15 ऑगस्ट रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येईल. याच दिवशी जॉन अब्राहम याचा 'बाटला हाऊस' सिनेमा प्रदर्शित होणार असून बॉक्स ऑफिस वर कोणता सिनेमा बाजी मारणार, हे आता प्रेक्षकच ठरवतील.