Mirzapur 2 Promo: कोणाची होणार 'मिर्झापूर'ची गादी? पहा Pankaj Tripathi आणि Divyendu Sharma यांच्या तगड्या संवादाने सजलेला 'मिर्झापूर 2' चा नवा प्रोमो (Watch Video)
Divyendu Sharma and Pankaj Tripathi in Mirzapur 2 (Photo Credits: YouTube)

भारतामध्ये वेबसिरीजचा जमाना सुरु झाल्यावर फार कमी अशा भारतीय सिरीज आहेत, ज्यांनी प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. अशीच एक Amazon Prime वरील सिरीज आहे, ‘मिर्झापूर’ (Mirzapur). पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi), अली फजल (Ali Fazal), दिव्येंदु शर्मा (Divyendu Sharma) यांचा कसदार अभिनयाने सजलेला मिर्झापूरचा पहिला सिझन प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला होता. गेले अनेक महिने या सिरीजच्या दुसऱ्या सिझनबाबत विचारणा होत होती व आता 23 ऑक्टोबर, 2020 रोजी मिर्झापूर 2 (Mirzapur) प्रेक्षांच्या भेटीला येणार आहे. त्याआधी या शोबाबत बझ निर्माण करण्यासाठी मेकर्स अनेक पोस्टर्स व प्रोमो प्रसिध्द करत आहेत.

आताही मिर्झापूर 2 चा एक नवा प्रोमो समोर आला आहे. यामध्ये पंकज त्रिपाठी  व दिव्येंदु शर्मा यांच्यामधील तगडा संवाद आहे. या प्रोमोमध्ये कोणताही व्हिडिओ नाही, फक्त कालीन भाई व मुन्ना यांच्या प्रतिमा दिसत असून, मागून दोघाने दमदार संवाद ऐकू येतात. या प्रोमोमध्ये कालीन भाई व मुन्ना गादीवर बसण्याच्या नियमांबाबत बोलत आहेत. कालीन भाई म्हणतो, नियम सर्वांना सेम असतील तर मुन्ना त्याला प्रत्युत्तर देतो की, गादीवर बसल्यावर नियम बदलले जाऊ शकतात. तर अशा या प्रोमोवरून चाहत्यांना पुढच्या काही घटनांची कल्पना आली असेल. (हेही वाचा: कोरोना विषाणूच्या काळात लोकांचे मनोरंजन करण्यासाठी येत आहेत Mirzapur 2, Tandav, A Suitable Boy यांसारख्या अनेक वेबसिरीज; पहा यादी)

पहा प्रोमो -

याआधी मिर्झापूर 2 चे एक पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते, ज्यामध्ये श्वेता त्रिपाठी आणि अली फजल बदला घेण्यासाठी सज्ज असल्याचे दिसत होते. पहिल्या सीझनच्या शेवटी दाखवण्यात आले आहे की, मुन्ना त्रिपाठीने एका लग्न समारंभात गेलेला गुड्डू, त्याचा भाऊ बबलू (विक्रांत) आणि पत्नी स्वीटी (श्रिया पिळगावकर) यांच्यावर हल्ला केला आहे. इथे बबलू आणि स्वीटी यांचा मृत्यू होतो. त्यानंतर जखमी गुड्डू, गोलू (श्वेता त्रिपाठी) सह पळून जातो. मिर्झापूरच्या पहिल्या सिझनच्या या शेवटाने दुसर्‍या हंगामाची उत्सुकता वाढवली आहे.