Milkha Singh Death: ऑनस्क्रीन मिल्खा सिंह साकारणाऱ्या Farhan Akhtar ची भावूक पोस्ट
Farhan Akhtar & Milkha Singh (Photo Credits: Instagram)

प्रसिद्ध धावपटू मिल्खा सिंह (Milkha Singh) यांचे काल रात्री 11.30 वाजता निधन झाले. कोविड-19 (Covid-19) संसर्ग आणि त्यातून उद्भवलेल्या समस्यांमुळे मिल्खा सिंह यांना आपले प्राण गमवावे लागले. 20 मे रोजी मिल्खा सिंह यांना कोरोना संसर्गाचे निदान झाले. त्यानंतर 2 जून पर्यंत त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यामुळे त्यांना आयसीयू (ICU) मध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र काल अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे सर्वच स्तरातून शोक व्यक्त केला जात आहे. दरम्यान, ऑनस्क्रिन मिल्खा सिंह साकारणारा बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर (Farhan Akhtar) याने देखील सोशल मीडियावर भावूक पोस्ट केली आहे. (Milkha Singh Passes Away: जगप्रसिद्ध धावपटू मिल्खा सिंह यांचे COVID-19 संसर्गामुळे निधन)

पोस्टच्या माध्यमातून भावना व्यक्त करताना फरहान अख्तर याने लिहिले की, "प्रिय मिल्खा जी, माझ्या आतमधील एक हिस्सा अजूनही ही मानायला तयार नाही की तुम्ही या जगात नाही. कदाचित हा जिद्दी स्वभावही मी तुमच्याकडून घेतला असेल. जेव्हा एखादी गोष्ट मनात भरते तेव्हा ते हार मानत नाही. खरंतर तुम्ही नेहमीच जिवंत असाल. कारण तुम्ही एक मोठ्या मनाचे, विनम्र आणि दयाळू व्यक्ती होतात."

फरहान अख्तर पोस्ट:

फरहान पुढे लिहितो, "तुम्ही एका विचाराचे, स्वप्नाचे प्रतिनिधित्व करता. मेहनत, इमानदारी आणि प्रचंड आवडीने एखादी कशी व्यक्ती आकाशाला गवसणी घालू शकते, याचे तुम्ही मुर्तिमंत उदाहरण आहात. तुम्ही एका विचाराचे, स्वप्नाचे प्रतिनिधित्व करता. मेहनत, इमानदारी आणि प्रचंड आवडीने एखादी कशी व्यक्ती आकाशाला गवसणी घालू शकते, याचे तुम्ही मुर्तिमंत उदाहरण आहात. अनेकांसाठी तुम्ही मित्र, वडीलांच्या रुपात आहात आणि हा एक आशीर्वाद आहे. तुम्ही एक प्रेरणा आणि यशातही माणूसकी जपणारे आहात. माझे तुमच्यावर प्रचंड प्रेम आहे."