सैफ अली खान (Photo Credits: Instagram)

#MeToo या लैगिंक शोषणाविरूध आवाज उठवणार्‍या मोहिमेमध्ये आलोकनाथ, नाना पाटेकर, चेतन भगतपासून विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळींची नावं पुढे आली आहेत. या मोहिमेतून रूपेरी, झगमत्या दुनियेमागील काळी बाजू लोकांसमोर आली आहे. पण लैंगिक शोषणाचा सामना केवळ महिलांनाच नव्हे तर सिनेसृष्टीमध्ये पुरूषांनाही करावा लागतो. अभिनेता सैफ अली खानचंही नाव आता MeToo मोहिमेमध्ये आलं आहे.

सैफ अली खान म्हणतोय #METoo

सैफ अली खानही बॉलिवूडमध्ये झालेल्या मनस्तापाबद्दल बोलला आहे. मात्र सैफला झालेला त्रास हा लैंगिक शोषणाचा नसून मानसिक मनस्तापाचा आहे. DNA ला मुलाखत देताना सैफ अली खान म्हणाला,"अनेकदा लोकांना दुसरे कशातून जात आहेत? याची कल्पना नसते. 25 वर्षांपूर्वी मलाही मानसिक त्रासातून जावं लागालं होतं. आजही त्या गोष्टीचा विचार केला करून मला त्रास होतो. मात्र सध्या सुरू असलेली चळवळ ही महिलांच्या समस्यांकडे लक्ष देणारी आहे. त्यांना वेळीच न्याय मिळणं आज गरजेचे आहे. तसेच महिलांसोबत चूकीचं वर्तन करणार्‍यांवर तात्काळ कडक कारवाई होणं गरजेचं आहे.

सध्या METooद्वारा समोर आलेली प्रकरणं निकालात काढण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न सुरू आहे. या प्रकरणासाठी स्वतंत्र समिती नेमून निकाल लावण्यासाठी सोय केली जाणार आहे.