फिल्म मास्टर पोस्टर (Image Credit: Twitter)

Master Box Office Collection Day 5: सुपरस्टार थलापती विजय (Thalapathy Vijay) याचा बहुप्रतिक्षित तमिळ सिनेमा 'मास्टर' (Master) ने संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. लॉकडाउननंतर ओपन थिएटर्समध्ये प्रदर्शित होणारा सुपरस्टारचा हा पहिला मोठा चित्रपट आहे. प्रेक्षकांचा चित्रपटाला कसा प्रतिसाद मिळतो याची सर्वांना उत्सुकता होती. चित्रपटाचा हा प्रतिसाद पाहिल्यानंतर निर्मात्यांमध्ये उत्साही वातावरण निर्माण झालं आहे. 13 जानेवारी रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटाने 100 कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे. यामुळे निर्मात्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

चित्रपट व्यापार विश्लेषक पंडित श्रीधर पिल्लई यांनी मास्टरची एकूण कमाई समोर आणली आहे. श्रीधर यांनी सांगितले की, मास्टर चित्रपटाने तमिळनाडूमध्ये 81 कोटी कमावले आहेत. तसेच तेलुगु राज्यांमध्ये 20 कोटी, कर्नाटकमध्ये 14 कोटी, केरळमध्ये 7.5 कोटी आणि हिंदी डबने 2.5 कोटी कमावले आहेत. ज्यानंतर या चित्रपटाची एकूण कमाई 125 कोटी झाली आहे. (वाचा -'Liger' First Look: दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे यांच्या 'लाइगर' चित्रपटाचा फर्स्ट लूक आला समोर)

मास्टरच्या हिंदी रिमेकसाठी एंडेमोल शाईन इंडिया, सिने 1 स्टुडिओ आणि 7 स्क्रीन ने हक्क खरेदी केले आहेत. मास्टर सिनेमा रिलीज होण्यापूर्वी त्यातील काही सीन्स लीक झाले होते. त्यानंतर चित्रपटातील अभिनेत्यांनी आणि निर्मात्यांनी सीन्स कुठेही शेअर करू नका, असं आवाहन केलं होतं. तसेच हा चित्रपट तमिळ रॉकर्स आणि टेलिग्राम चॅनलवर पायरसीचा शिकार झाला होता. त्यामुळे या सिनेमाच्या कमाईवर मोठा परिणाम होणार असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र, चित्रपटाने बक्कळ कमाई केल्याचं पाहायला मिळत आहे.