'Liger' First Look: दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे यांच्या 'लाइगर' चित्रपटाचा फर्स्ट लूक आला समोर

पुरी जगन्नाथ यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. विजय आणि अनन्यासोबत या चित्रपटात राम्या कृष्णन, रोनित रॉय, विशु रेड्डी, आली आणि गेटअप श्रीनु हेदेखील पाहायला मिळणार आहेत.

'Liger' First Look: दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे यांच्या 'लाइगर' चित्रपटाचा फर्स्ट लूक आला समोर
लाइगर पोस्टर (Image Credit: Instagram)

'Liger' First Look: तेलगू चित्रपटातील प्रसिद्ध स्टार विजय देवेराकोंडा (Vijay Deverakonda) अनन्या पांडे (Ananya Panday) सोबत पहिल्यांदा 'लाइगर' (Liger) या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाविषयी बरीच चर्चा रंगली होती. नुकताचं निर्मात्यांनी चित्रपटाचा पहिला लुक प्रसिद्ध केला आहे. ज्यामध्ये विजय देवरकोंडा मुख्य भूमिकेत दिसला आहे. चित्रपटाच्या पोस्टरमध्ये त्याचा दमदार लूक दिसत आहे. पहिल्या लूकमध्ये विजय बॉक्सिंग ग्लोव्ह्ज घातलेले पाहायला मिळत आहेत. तसचे त्यांच्या मागे सिंहाचा फोटो दिसत आहे.

हा फोटो शेअर करताना विजयने लिहिलं आहे की, 'आम्ही नम्रपणे आमचे संपूर्ण भारतभर आगमन जाहीर केले आहे. या चित्रपटामुळे संपूर्ण देशात वेडेपणाची हमी देतो.' दरम्यान, पुरी जगन्नाथ यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. विजय आणि अनन्यासोबत या चित्रपटात राम्या कृष्णन, रोनित रॉय, विशु रेड्डी, आली आणि गेटअप श्रीनु हेदेखील पाहायला मिळणार आहेत. (वाचा - Web Series Tandav: 'तांडव' अडचणीत; अ‍ॅमेझॉन प्राइमच्या भारतातील प्रमुखासह निर्माता-दिग्दर्शक, लेखकावर गुन्हा दाखल)

लॉक दरम्यान विजयने आपल्या नामांकित 'द देवरकोंडा फाउंडेशन' च्या माध्यमातून अनेक गरजूंना मदत केली. त्याने 17,723 मध्यमवर्गीय कुटुंबांना किराणा सामान व मूलभूत गरजा पूरवल्या होत्या. यासाठी विजयने 1.7 कोटी रुपये खर्च केला होता. विजय देवरकोंडा यांचे भारतात लाखो चाहते आहेत. विजयच्या डिअर कॉम्रेड आणि गीता गोविंदम या चित्रपटाने अक्षरक्षा धुमाकूळ घातला होता. अनेक हिंदी प्रेक्षकांनी त्याचे हे चित्रपट तमिळ भाषेमधून पाहिले. या चित्रपटांची लोकप्रियता पाहून त्याचे हिंदी डबिंग करण्यात आलं आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jan 18, 2021 12:24 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).