'मणिकर्णिका' चित्रपटाच्या निर्मात्यांना अर्धांगवायूचा झटका
कमल जैन (फोटो सौजन्य-ट्वीटर)

अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut)हिचा आगामी चित्रपट 'मणिकर्णिका'(Manikarnika) या चित्रपटाचे निर्माते कमल जैन यांना अर्धांगवायूचा झटका आला आहे. कमल जैन (Kamal Jain) यांच्यावर कोकीलाबेन रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले असल्याचे सांगितले जात आहे.

मणिकर्णिका चित्रपट प्रदर्शित होण्याच्या पाच दिवस आधी कमल जैन यांची प्रकृती बिघडल्याने सर्व टीमला धक्का बसला आहे. कमल जैन हे झी स्टुडिओस व कैरोस कोनटेंट स्टुडिओस सोबत मणिकर्णिका या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. येत्या 25 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. कमल जैन यांच्या ट्विटर अकाऊंटवरून एक भावनिक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. ('मणिकर्णिका' सिनेमा वादावरुन कंगना रनौतकडून करणी सेनेला खुलेआम आव्हान, असे काही म्हणाली...)

या पोस्टमधून मणिकर्णिकाच्या टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. ‘हॉस्पिटमध्ये अॅडमिट होण्याची ही योग्य वेळ नाही. माझी संपूर्ण टीम,कंगना, प्रसूनजी, विजेयंद्रजी, शंकर अहसान, अंकिता, मिश्टी आणि इतर सर्वांना मी खूप मिस करतोय. मी लवकरच परत येईन. तो पर्यंत मी मनाने तुमच्या सोबत राहणार आहे. आपण गेली दोन वर्षे या मणिकर्णिकाला ब्लॉकबस्टर चित्रपट बनविण्यासाठी प्रचंड महेनत घेतली आहे. आता ते स्वप्न पूर्ण होणार आहे.’ असे जैन यांनी ट्विट केले आहे.