Renjusha Menon Dies: मल्याळम अभिनेत्री रेंजुषा मेनन हिचा वयाच्या 35  व्या वर्षी मृत्यू; त्रिवेंद्रम येथील अपार्टमेंटमध्ये आत्महत्या
Renjusha Menon | (Photo Courtesy: Instagram)

मल्याळम अभिनेत्री रेनजुषा मेनन (Renjusha Menon Dies) हिचा मृत्यू झाला आहे. ती केवळ 35 वर्षांची होती. तिरुवनंतपुरम (Thiruvananthapuram) येथील अपार्टमेंटमध्ये एका फ्लॅटमध्ये तिचा मृतदेह सोमवारी (30 ऑक्टोबर) सकाळी आढळून आला. हा फ्लॅट तिचा पती, सहकारी अभिनेता मनोज याच्यासोबत तिने घेतला होता. तिच्या मृत्यूनंतर अनेक शंका उपस्थित केल्या जात आहे. काहींनी तिच्या अकाली मृत्यूला ती आर्थिक कारण जबाबदार असल्याचे म्हटले आहे. तर काहींनी म्हटले आहे तिने हे पाऊल नैराश्येतून उचलले असावे. प्राथमिक माहितीनुसार, तिने आत्महत्या केली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, पोलिसांनी तिच्या मृत्यूची नोंद घेतली असून तपास सुरु केला आहे. सध्या सुरू असलेल्या चौकशीचा भाग म्हणून तिच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे.

रेंजुषा मेनन, मूळची कोचीची. तिने टीव्ही शो अँकर म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. नंतर ती टेलिव्हिजन मालिकांमध्ये काम करु लागली. छोट्या पडद्यावरील तिच्या प्रवेशाची सुरुवात 'स्त्री' या मालिकेने झाली. ज्याद्वारेतिने तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. पुढे तिने इतर विविध मालिका, चित्रपटांमध्ये काम केले. (हेही वाचा, Aparna P Nair Death:तमिळ चित्रपटसृष्टीत शोककळा, मल्याळम अभिनेत्री अपर्णा नायर यांचे निधन)

'सिटी ऑफ गॉड', 'मेरीकुंडोरू कुंजाडू,' 'बॉम्बे मार्च,' 'कार्यस्थान,' 'वन वे तिकीट', 'अथभूत द्विपू,' यांसारख्या उल्लेखनीय कामांसह अनेक टेलिव्हिजन शो आणि चित्रपटांमधील तिच्या सहाय्यक भूमिकांसाठी रेंजुषा मेनन खास ओळख मिळवली. याशिवाय तिने इतरही काही चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केल. याव्यतिरिक्त, रेनजुषा मेनन हिने विविध मालिकांमध्ये योगदान देत निर्माती म्हणून तिचा प्रभाव कायम ठेवला. तिच्या अभिनय कारकिर्दीपलीकडे, ती एक कुशल भरतनाट्यम नृत्यांगना देखील होती. तिच्या पश्चात वडील सीजी रवींद्रनाथ आणि आई उमादेवी असा परिवार आहे.

धक्कादायक म्हणजे तिच्या मृत्यूची बातमी पुढे येण्यापूर्वी तिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओही शेअरकेला होता. ज्यामध्ये ती सहकलाकारासोबत खूपच आनंदी दिसत होती. तिच्या निधनाच्या बातमीने तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. ज्यांनी तिच्या इंस्टाग्राम पृष्ठावर असंख्य शोक पोस्ट करून त्यांचे शोक आणि दु:ख व्यक्त केले आहे. एका वापरकर्त्याने व्यक्त केले, "भाग्य बदलण्यासाठी सेकंदाचा एक अंश पुरेसा आहे.."

व्हिडिओ

 

View this post on Instagram

 

A post shared by Sreedevi Anil (@anil_sreedevi)

उल्लेखनीय असे की, आणखी एक मल्याळम अभिनेत्री अपर्णा नायर हिने देखील काही दिवसांपूर्वची आत्मत्या केली होती. तीसुद्धा केवळ 33 वर्षांची होती. अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये दिसलेली अपर्णा तिच्या राहत्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली होती. ती पती आणि मुलांसोबत राहात होती.