Mahima Chaudhry (Photo Credits: File Image) .. Read more at: https://www.latestly.com/entertainment/bollywood/mahima-chaudhry-talks-about-the-accident-that-scarred-her-face-in-surgery-they-took-out-67-glass-pieces-1809195.html

1997 मध्ये 'परदेस' (Pardes) या चित्रपटाद्वारे महिमा चौधरी (Mahima Chaudhry) या अभिनेत्रीने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. हा चित्रपट इतका लोकप्रिय ठरला की महिमा रातोरात स्टार बनली. त्यानंतर महिमाचा ‘दाग-द फायर’ हा चित्रपटही लोकप्रिय ठरला. महिमा आपल्या करियरच्या पीकवर असताना तिला ‘दिल क्या करे’ (Dil Kya Kare) हा चित्रपट ऑफर झाला. हा चित्रपटही चालला मात्र त्यानंतर महिमाच्या करियरला उतरली कळा सुरु झाली. पुढे महिमा हळू हळू इंडस्ट्रीपासून दूर गेली व अनेकांना समजलेच नाही असे का घडले. आता तब्बल 21 वर्षांनतर महिमाने स्वतः याबाबत माहिती दिली आहे व याला कारणीभूत ठरला होता 1999 सालचा एक मोठा अपघात.

नुकतेच पिंकव्हिलाला दिलेल्या मुलाखतीत महिमाने याबद्दल भाष्य केले आहे. महिमा ‘दिल क्या करे’ चित्रपटाच्या शुटींगसाठी बेंगळूरू येथे होत्ती त्यावेळी एका ट्रकने तिच्या कारला धडक दिली होती. हा अपघात इतका मोठा होता की महिमाच्या गाडीच्या काचा तिच्या चेहऱ्यामध्ये घुसल्या होत्या. तिला रुग्णालयात दाखल केले गेले. मात्र तिचा चेहरा, जो कोणत्याही अभिनेत्रीसाठी सर्वात महत्वाची गोष्ट असते, काही प्रमाणात खराब झाला होता. शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांनी तब्बल 67 काचेचे तुकडे तिच्या चेहऱ्यामधून काढले होते. त्यानंतर मेकअपचा आधार घेऊन कसेतरी ‘दिल क्या करे’चे शुटींग पूर्ण झाले, मात्र महिमाचे करियर या अपघातामुळे जवळजवळ संपुष्टात आले. (हेही वाचा: सैफ अली खान, करीना कपूर चा तैमूरसोबत मरीन ड्राइव्हवर फेरफटका: पोलिसांनी केली 'ही' सुचना; पहा व्हिडिओ)

याबाबत महिमा म्हणते, शस्त्रक्रियेनंतर बरे होण्यासाठी तिला बराच वेळ लागला. बाहेर उन्हात ती जाऊ शकत नसल्यामुळे ती नेहमीच घरातच राहायची. घरातील दिवे बंद असायचे, जखमा भरून याव्यात म्हणून तिने सूर्यप्रकाशही चेहऱ्यावर पडू दिला नव्हता. त्यावेळी तिला इंडस्ट्रीमधील कोणीच आधार दिला नाही. हळू हळू कुटुंबाच्या मदतीने ती या धक्क्यातून बाहेर आली व पुढे तिने साईड रोल करायला सुरुवात केली. यादरम्यान महिलाला लोकांनी चांगले रोल देणेही बंद केले होते.  महिमाने 2010 नंतर फक्त 3 चित्रपटांमध्ये काम केले आहे मात्र सध्या अनेक कार्यक्रम, शोज, जाहिराती अशा गोष्टींद्वारे तिचे दर्शन घडते. महिमाला परदेससाठी पदार्पणासाठी उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळाला आहे.