Rhea Chakraborty (Photo Credits-ANI)

अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या 14 जून दिवशी आत्महत्या करून जीवन संपवल्यानंतर अनेक गोष्टींबाबत प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. दरम्यान महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाने सुशांतच्या मृत्यूनंतर त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिच्या शवगृहात जाऊन सुशांतचा मृतदेह पाहण्याच्या गोष्टीवरून रियाला आणि मुंबई पोलिसांना एक नोटीस बजावली. आज Maharashtra SHRC Chairman दिलेल्या माहितीनुसार, या नोटीशीवरून मीडिया रिपोर्ट्सच्या आधारे तपास केल्यानंतर आयोगाने मुंबई पोलिस आणि रिया चक्रवर्ती दोघांनाही क्लिन चीट दिली आहे.

दरम्यान सुशांतच्या मृत्यूनंतर रिया चक्रवर्ती तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती सोबत कूपर हॉस्पिटलमध्ये गेला होते. तेथे त्यांनी सुशांतचा मृतदेह कूपर हॉस्पिटलच्या शवागृहात पाहिला. दरम्यान या प्रकारात मुंबई पोलिस तसेच कूपर हॉस्पिटल कडून कोणत्याही नियमांचे उल्लंघन झाले नसल्याचा अहवाल महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाने दिला आहे.

ANI Tweet

दरम्यान रिया शवागृहात कशी पोहचली यावरून अनेकांनी प्रश्न उचलले होते. यावर सुशांतच्या वकिलांकडून रियाला कोणाची तरी मदत होती. कोविड 19 सारखी परिस्थिती असताना रिया तिथे पोहचली कशी असा प्रश्न विचारण्यात आला होता. सहाजिकच मुंबई पोलिस किंवा हॉस्पिटल प्रशासनाकडून तिला मदत झाली आहे असा दावा करण्यात आला होता.

मुंबई पोलिसांनी यापूर्वीच सुशांत सिंह राजपूत प्रकरणी पोलिस खात्याची बदनामी केली जात असल्याचं सांगत बॉम्बे हाय कोर्टात धाव घेतली होती. कोर्टानेही तपासावर परिणाम होईल अशा गोष्टी मीडियाने ताळाव्यात असं सांगितलं आहे.