बॉलिवूड कलाकार (Photo Credits-Yogen Shah/ANI)

आज देशभरात सर्वत्र विधानसभा निवडणूकीसाठी (Assembly Elections) मतदान पार पडत आहे. महाराष्ट्रात 288 जागांवर मतदान होणार असून हरियाणा मध्ये 90 विधानसभा मतदानसंघात मतदान केले जाणार आहे. पण मुंबईतील मतदानाची चुरस अधिक रंगणार असल्याची दिसून येणार आहे. कारण नेहमी प्रमाणे या वर्षीसुद्धा बॉलिवूड कलाकार मतदान करणार आहेत.खरंतर प्रत्येक निवडणूकीपूर्वी बॉलिवूड कलाकार आपल्या आवडत्या उमेदवारासोबत प्रचाररॅलीत दिसून येतात. तसेच निवडणूकीच्या दिवशी सामान्य व्यक्तीपासून ते दिग्गज बॉलिवूड कलाकार मतदान करण्यासाठी घराबाहेर पडलेले दिसून येतात. तर जाणून घ्या कोणते कलाकार विधानसभा निवडणूकीसाठी मतदान करु शकतात.

प्रत्येकवेळ प्रमाणे मुंबईतील जुहू येथे बच्चन परिवार मतदान करण्यासाठी जाताना दिसून येणार आहेत. दरम्यान दोन दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यामुळे यंदा ते मतदार करणार की नाही याकडे आता अधिक लक्ष लागून राहणार आहे. त्याचसोबत जुहू येथून ऋतिक रोशन, शिल्पा शेट्टी, अर्जुन कपूर आणि हेमा मालिनीसह अन्य कलाकार सुद्धा मतदान करणार आहेत.(महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019: मतदान कसे करावे आणि मतदार यादीत 'या' पद्धतीने शोधा तुमचे नाव)

तसेच वांद्रे मध्ये राहणाऱ्या बॉलिवूड कलाकारांपैकी सलमान खान, शाहरुख खान, आमिर खान, उर्मिला मातोंडर वांद्रे पश्चिम येथे मतदान करणार आहेत. तर विले पार्ले पोलिंग बूथ येथे भाजप नेते आणि अभिनेता परेश रावल ही मतदान करु शकणार आहेत. अजय देवगण, काजोल, संजय दत्त, करिना कपूर, कंगना, टायगर श्रॉफ, सोनाली बेंद्रे, शंकर महादेवन सारखे कालाकर ही प्रत्येक वर्षाप्रमाणे यावेळी सुद्धा मतदान करणार आहे. परंतु अक्षय कुमार, आलिया भट्ट, करतरिना कैफ आणि सनी लिओनी यांचे विदेशी नागरिकत्व असल्याने ते मदतान करु शकत नाहीत.

विधानसभा निवडणूकीबाबत बोलायचे झाल्यास महाराष्ट्रात भाजप-शिवसेना महायुती काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला टक्कर देणारी ठरणार आहे. तर हरियाणा मध्ये भाजपचा थेट मुकाबला काँग्रेस आणि जेजेपी सोबत होणार आहे.