महाराष्ट्रात 21 तारखेला विधानसभा निवडणूकीसाठी मतदान पार पडणार आहे. तर 24 तारखेचा या निवडणूकीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. महाराष्ट्रात होणाऱ्या निवडणूकीची रंगत भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रावादी पक्षात दिसून येणार आहे. महाराष्ट्रातील 288 जागांवर विधानसभा निवडणूका होणार आहेत. त्याचसोबत मतदारांची संख्या महाराष्ट्रात 8.9 करोड आहे. त्यामधील 4.6 करोड पुरुष आणि 4.2 महिला मतदारांचा समावेश आहे. त्याचसोबत 2,643 मतदार हे तृतीयपंथी आहेत.मतदान करणाऱ्या मतदारांचे नाव हे मतदार यादीत सहभागी केलेले असते. तसेच मतदाराबाबत त्याचे नाव, पत्ता आणि लिंगसह माहिती आणि कोणत्या विभागील आहे त्याची माहिती दिलेली असते.
मतदानावेळी मतदारांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे हा सर्व गोंधळ होण्याआधीच तुम्ही ऑनलाईन पद्धतीने आपले मतदान केंद्र पाहू शकता. तर जाणून घ्या मतदार यादीत तुमचे नाव कसे शोधाल.
-प्रथम https://ceo.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर जावे.
-त्यानंतर तेथे Voter List या ऑप्शनवर क्लिक करावे.
-तुम्हाला महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीची वेबसाईट दोन पद्धतीने शोधता येणार आहे. एकतर नावाने किंवा आयडी कार्डच्या पद्धतीने. तसेच मतदाराला नाव शोधायचे असल्यास त्याने Name Wise त्याचे नाव कोणत्या मतदारसंघात आहे ते शोधावे. त्यानंतर तुम्हाला जिल्हा आणि मतदारसंघाचा ऑप्शन दाखला जाईल.
-मतदारांना नाव शोधण्यासाठी वेबसाईटवर त्यांचे नाव, आडनाव, वडिलांचे नाव आणि अन्य एक ऑप्शन दाखवला जाईल. त्यानंतर सर्च करुन तुम्हाला तुमचे नाव दाखवले जाई,
-आयडी कार्डप्रमाणे सुद्धा तुम्हाला तुमचे नाव मतदार यादीत शोधता येणार आहे. त्यासाठी मतदाराला जिल्हा, आयडी कार्ड क्रमांक आणि अन्य एक ऑप्शन दाखवला जाणार आहे.
सरकारने मतदारांसाठी 1950 हा हेल्पलाईन क्रमांक जारी केला आहे. तुम्हाला यावर SMS करून माहिती मिळवता येणार आहे. तसेच याव्यतिरिक्त दिव्यांग मतदारांना ‘पीडब्ल्यूडी’ या ॲपचा वापर करता येणार आहे. यामध्ये दिव्यांग मतदारांना मतदान केंद्राचा शोध घेणं, व्हीलचेअरची मागणी करणं, मतदार नोंदणी करणं, आदी सुविधा दिल्या जाणार आहेत.