श्रीराम नेने व माधुरी दीक्षित (Photo Credit: Youtube)

आपल्या सामान्य माणसांना हा नेहमीच हा प्रश्न पडती की, आपले आवडते सेलिब्रेटी कसे राहत असतील? ते नक्की काय खात असतील? सेलेब्जच्या वैयक्तिक आयुष्याबाबत जाणून घेणे हा नेहमीच आपल्यासाठी उत्सुकतेचा विषय असतो. जेव्हापासून सोशल मीडिया आले आहे तेव्हापासून या गोष्टी थोड्या सोप्या झाल्या आहेत. आता आपली लाडकी मराठी तारका माधुरी दीक्षितचा (Madhuri Dixit) आवडता पदार्थ आहे साबुदाण्याची खिचडी (Sabudana Khichdi). माधुरीने सोशल मिडियाच्या माध्यमातून या खिचडीची एक स्पेशल रेसिपी दाखवली आहे. महत्वाचे म्हणजे ही डिश बनवण्यासाठी माधुरीचे पती श्रीराम नेने (Shriram Nene) यांनी तिची मदत केली आहे. सध्या या गोष्टीचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

माधुरी दीक्षितने हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये डॉ नेने खिचडी बनवताना दिसत आहेत, तर माधुरी त्यांना हा पदार्थ कसा बनवायचा हे सांगत आहे. व्हिडिओ शेअर करताना माधुरीने कॅप्शन दिले आहे- ‘साबूदाणा खिचडी, ऐकूनच भुक लागली ना?’ या साबुदाणा खिचडीची पूर्ण रेसिपी अगदी मजेशीर पद्धतीने या नवरा-बायकोने सादर केली आहे. खिचडी बनवताना नक्की कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची, यासाठी वापरण्यात येणाऱ्या इतर गोष्टींचे प्रमाण अशा अनेक गोष्टी माधुरीने या व्हिडिओमध्ये शेअर केल्या आहेत.

पहा व्हिडिओ -

या संपूर्ण प्रक्रियेमध्ये डॉक्टर नेने ज्याप्रमाणे माधुरीला मदत करत आहेत, ते पाहून नक्कीच त्यांचे कौतुक करावेसे वाटते. दरम्यान, कोरोना संसर्गामुळे जेव्हा जग लॉकडाऊनमध्ये होते, तेव्हा माधुरी दीक्षितने घरी बसलेल्या लोकांना नृत्य प्रशिक्षण दिले होते. एवढेच नाही तर तिने पती श्रीराम नेने यांना नवीन हेअरकटही दिला होता. आता माधुरी तिच्या नवऱ्याला स्वयंपाक, मुख्यत्वे मराठी पदार्थ कसे बनवायचे हे शिकवत आहे.

याआधी माधुरीने मोदकाची रेसिपीही तिच्या युट्यूब वाहिनीवर शेअर केली होती. त्यालाही चाहत्यांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद लाभला होता.