कृति सेनन (Image Credit: Instagram)

बॉलिवूड अभिनेत्री कृति सेनन (Kriti Sanon) हिला काही दिवसांपूर्वी कोरोनाची (Coronavirus) लागण झाली होती. दरम्यान, तिची पुन्हा कोरोना चाचणी करण्यात आली होती. या चाचणीत तिचा अहवाल निगेटिव्ह आली आहे. नुकतीच तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या प्रकृतीबाबत माहिती दिली आहे. ज्यात तिने आपली कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याचेही सांगितले आहे. तसेच तिने डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांसह आपल्या चाहत्यांचेही आभार मानले आहेत. कृति हिची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर तिच्या चाहत्यामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहेत.

कृति सेननला 9 डिसेंबर रोजी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर गेल्या दहा दिवासांपासून तिच्यावर उपचार सुरु होते. मात्र, नुकतेच तिने एक ट्वीट केले आहे. ज्यात ती कोरोना निगेटिव्ह आल्याचे तिने सांगितले आहे. तसेच मला मदत आणि सहकार्य केल्याबद्दल मी बीएमसी अधिकारी, सहायक आयुक्त विश्वास मोटे आणि डॉक्टरांचे मनापासून आभार मानते. तसेच माझ्यासाठी प्रार्थना करणाऱ्या आणि कधीच न संपणाऱ्या प्रेम देण्याबद्दल धन्यवाद, अशी पोस्ट तिने केली आहे. हे देखील वाचा-Jug Jugg Jeeyo: वरुण धवन, नीतू कपूर यांची COVID19 वर मात, चंदीगढ मध्ये पुन्हा सुरु होणार शूटिंग

कृति सेनन हिचे ट्विट-

 

कृति सेनन फरहद संभाजी दिग्दर्शित ‘बच्चन पांडे’ चित्रपटात अक्षय कुमारच्या सोबत दिसणार आहे. याशिवाय 'जुग जुग जिओ' मध्येही ती झळकणार आहे. या चित्रपटात कृती हिच्यासोबत वरुण धवन, कियारा अडवाणी, नीतू कपूर आणि अनिल कपूर मुख्य भुमिकेत असणार आहेत.