कोरोना विषाणूने (Coronavirus) संपूर्ण देशात पुन्हा एकदा धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. महाराष्ट्रात या संसर्गाचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. आता बॉलिवूडला जणू काही कोरोनाचे ग्रहण लागल्याचे दिसत आहे. अक्षय कुमार, गोविंदा, विकी कौशल, भूमी पेडणेकर अशा अनेक कलाकारांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये आता अजून एक नाव जोडले गेले आहे ते म्हणजे अभिनेत्री कॅटरिना कैफ (Katrina Kaif). कॅटरिना कैफने सोशल मिडियाच्या माध्यमातून आपल्याला कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याची माहिती दिली आहे.
अभिनेत्री कतरिना कैफने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, 'माझा कोरोना अहवाल सकारात्मक आला आहे. मी त्वरित स्वत:ला आयसोलेट केले आहे व सध्या मी घरीच आहे. मी माझ्या डॉक्टरांच्या सल्ल्याने सर्व सेफ्टी प्रोटोकॉल फॉलो करत आहे. मी माझ्या संपर्कातील सर्व लोकांना आवाहन करते की त्यांनी त्वरित स्वतःची चाचणी करून घ्या. आपले प्रेम आणि पाठींब्याबद्दल धन्यवाद. सुरक्षित राहा आणि स्वत: ची काळजी घ्या.' (हेही वाचा: Milind Soman ने या काढ्याच्या मदतीने केली COVId 19 वर मात;पत्नी Ankita Konwar सोबतचा फोटो शेअर करत शेअर केली सिक्रेट रेसिपी)
यापूर्वी कतरिनाचा कथित प्रियकर विक्की कौशल कोरोना पॉझिटिव्ह असल्याची बातमी समोर आली होती. कोरोनाची दुसरी लाट बॉलिवूडमध्ये वेगाने वाढत आहे. यावर्षी रणबीर कपूर, आलिया भट्ट, मिलिंद सोमण, कार्तिक आर्यन, भूमी पेडणेकर, अक्षय कुमार, गोविंदा यांना आधीच कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी कार्तिक आर्यन, रणबीर कपूर आणि मिलिंद सोमण यांची कोरोना चाचणी नकारात्मक आली आहे. गेल्या वर्षी गायली कनिका कपूर, अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय, आराध्या बच्चन यांच्यासह अनेक सेलिब्रिटींना कोरोनाची लागण झाली होती.