Katrina Kaif ची कोरोना चाचणी आली निगेटीव्ह, फोटो शेअर करुन दिली माहिती
Katrina Kaif Tested COVID Negative (Photo Credits: Instagram)

बॉलिवूडमध्ये आतापर्यंत अनेकांना कोरोनाची लागण झाली आहे. यात कलाकारांपासून, दिग्दर्शक, गायक, कोरिओग्राफर अशा अनेकांना कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आलेली अभिनेत्री कैटरीना कैफ (Katrina Kaif) आता बरी झाली असून तिची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. कैटरीनाने स्वत: सोशल मिडियाद्वारे याबाबत माहिती दिली आहे. आपला एक क्युट फोटो शेअर करुन कैटरीनाने आपली कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याचे सांगितले आहे. या फोटोमध्ये तिने पिवळ्या रंगाची पँट आणि पिवळ्या रंगाचा टी शर्ट घातला आहे.

कैटरीनाने आपला हा फोटो शेअर करून, "निगेटीव्ह. ज्या लोकांनी माझी या दिवसांत काळजी घेतली. माझ्यासाठी प्रार्थना केली आणि आपले प्रेम पाठवले. त्या सर्वांचे आभार." हा फोटोमध्ये कैटरीना खूपच सुंदर दिसत आहे.हेदेखील वाचा- Manish Malhotra Tests Positive for COVID19: फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह; स्वत:ला होम क्वारंटाईन करत सोशल मीडियावर दिली माहिती

 

View this post on Instagram

 

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)

दरम्यान काही दिवसांपूर्वी विकी कौशलची कोरोना चाचणी देखील निगेटीव्ह आली आहे. त्याने देखील सोशल मिडियाद्वारे याबाबत माहिती दिली. विकी कौशल आधी संजय लीला भन्साळी, आलिया भट, रणबीर कपूर, आमिर खान, आर माधवन, परेश रावल यांना कोरोनाची लागण झाली होती. दरम्यान आज सोनू सूद आणि फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रा याला देखील कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.