चूकीच्या पद्धतीने आरतीचं ताट फिरवल्याने कॅटरिना कैफ ट्विटर होतेय ट्रोल
कॅटरिना कैफ आरती करताना (Image Source :Twitter )

सलमान खानच्या घरी जशी ईद उत्साहाने साजरी होते तितक्याच उत्साहात गणेशोत्सवदेखील साजरा होतो. मागील वर्षापासून सलमान खानच्या म्हणजेच गॅलेक्सी अपार्टमेंटऐवजी सलमानची बहीण अर्पिताकडे गणेशाची स्थपना केली जाते. खान कुटुंबीयांप्रमाणेच अभिनेत्री कॅटरिना कैफदेखील या गणेशोत्सवाला उपस्थिती लावते. मात्र यंदाच्या गणेशोत्सवात उलट्या दिशेने आरतीचं ताट फिरवल्याने कॅटरिना कैफ ट्रोल होत आहे.

सोशल मीडियात चर्चा

अलविरा खानचा पती, निर्माता अतुल अग्निहोत्रीने खान कुटुंबीयांच्या घरच्या आरतीचा एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला होता. या व्हिडियोमध्ये खान कुटुंबातील एक एक सदस्य पुढे येऊन आरतीचं ताट घेत होतं. कॅटरिना कैफही आरती करायला पुढे आली. मात्र डावीकडून उजवीकडे फिरवण्याचं ताट तिने उलट्या बाजूने फिरवत आरती केली. कॅटरिना कैफचा हा प्रकार पाहून अनेक ट्विटरकरांनी तिला आरती कशी करायची याचे सल्ले दिले आहेत.

दीड दिवसांचा गणेशोत्सव

पूर्वी सलमान खानच्या घरी म्हणजेच गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये बसणारा गणपती आता अर्पिता खान -शर्माच्या घरी बसवला जातो. अर्पिताच्या जुहूच्या घरी दोन गणेशमूर्ती स्थापन करून दीड दिवसांनी गणपतींचं विसर्जन करते.

सलमान कॅटरिना लवकरच एकत्र

अतुल अग्निहोत्री निर्मित 'भारत' सिनेमामध्ये सलमान आणि कॅटरिना कैफ एकत्र दिसणार आहे. पुढील वर्षी 2019च्या ईदला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.