आमिर खान च्या नकळत करिनाने काढला त्याचा 'अशा' अवस्थेत झोपलेला फोटो, पाहून तुम्हालाही हसू होईल अनावर
Aamir Khan (Photo Credits: Instagram)

'थ्री इडियटस' (3 Idiots) चित्रपटातून करिना कपूर (Kareena Kapoor) आणि मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान (Aamir Khan) ही जोडी झळकली होती. त्यानंतर या दोघांचेही बाँडिंगही छान जमले होते. त्यानंतर ते तलाश, बॉम्बे टॉकिज या चित्रपटातही झळकले होते. मात्र हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटले. मात्र आता ही जोडी 7 वर्षानंतर पुन्हा एकदा एकत्र झळकणार आहे. आमिर खान चा 'लाल सिंग चड्ढा' (Laal Singh Chaddha) या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. नुकताच आमिर खानने आपला 55 वा वाढदिवस साजरा केला. या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान वाढदिवस आल्याने त्याने शूटिंग सेटवर बर्थडे सेलिब्रेट केला. या दिवशी त्याची सह कलाकार करिना कपूर हिने आमिर चा झोपलेला एक क्युट फोटो शेअर करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

या फोटोमध्ये आमिर खान उशी घेऊन झोपला आहे. या फोटोत तो खूपच क्युट आणि निरागस दिसत आहे.

पाहा फोटो:

 

View this post on Instagram

 

My fav co-star has to be @_aamirkhan's... pillow! ❤️🤭

A post shared by Kareena Kapoor Khan (@kareenakapoorkhan) on

'लाल सिंग चड्ढा' हा चित्रपट प्रसिद्ध हॉलिवूड चित्रपट 'फॉरेस्ट गम्प'चा हिंदी रिमेक आहे. 2021 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाची कथा मराठमोळ्या अतुल कुलकर्णीने लिहिली आहे. या चित्रपटात आमिर खान एक पंजाबी व्यक्तिरेखा साकारत आहे. सध्या वेगवेगळ्या देशात या चित्रपटाचे चित्रिकरण सुरु आहे.

काही दिवसांपूर्वी आमिरने या चित्रपटाचे पोस्टर शेअर करताना 'करिनासोबत येणाऱ्या प्रत्येक चित्रपटात रोमान्स करण्याची संधी मिळाली तर...,' अशी इच्छा व्यक्त केली आहे. या पोस्टरवर करिना आमिरला मिठी मारताना दिसतं आहे. व्हॅलेंटाईनच्या दिवशी आमिरने अशी इच्छा व्यक्त केल्याने चित्रपटसृष्टीतील अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.