बॉलिवूड स्टारकिड्समध्ये जो सर्वाधिक लोकप्रिय झाला तो म्हणजे करीना कपूर (Kareena Kapoor Khan) आणि सैफ अली खान (Saif Ali Khan) यांचा मुलगा तैमुर अली खान (Taimur Ali Khan)....अर्थात त्यात त्याची आई करीना कपूर हिचा देखील खारीचा वाटा आहे. करीनाने ती गरोदर असताना आपले बेबी बंप फ्लाँट करत मिडियासमोर निर्धास्तपणे वावरायची. त्यावेळी तिच्या चेह-यावर आलेला ग्लो देखील सर्वांचा चर्चेचा विषय ठरला होता. त्यानंतर 20 डिसेंबर 2016 मध्ये करीनाने तैमुरला जन्म दिला. आज तैमुरचा चौथा वाढदिवस... त्याच्या वाढदिवसादिवशी त्याच्या आईने करीना कपूरने एकदम हटके अंदाजात तैमुरला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. करीनाने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन तैमुरचे लहानपणीचे फोटो शेअर करुन त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
करीनाने या व्हिडिओमध्ये आपण तैमुरसोबत केलेल्या धमालमस्तीचे क्षण शेअर केले आहेत. या पोस्टला तिने छान कॅप्शनही दिले आहे.हेदेखील वाचा- Taimur Ali Khan: फोटो काढणा-या मिडियावर भडकला तैमूर अली खान, 'या' शब्दांत दिली सक्त ताकीद, Watch Video
View this post on Instagram
करीनाने म्हटले आहे की, "माझ्या मुला, मी खूप आनंदी आहे, की 4 वर्षाचा असताना तुझ्यात इतकी निष्ठा, दृढ संकल्प आणि जिद्द आहे की तुला माहिती आहे की, सुके गवत उचलून ते गायींना खायला देण्याचा तू प्रयत्न करत आहेस. देव तुला आशीर्वाद देवो. माझ्या मेहनती मुला हे सर्व करताना रस्त्यावरी बर्फाचा आनंद देखील घे. फुल तोडं. मनसोक्त खेळ, झाडांवर चढ आणि हो तुझा आवडीचा केक खायला विसरू नकोस. Happy Birthday" असं करीनाने पोस्टखाली लिहिले आहे.
दरम्यान त्याची आई अभिनेत्री करीना कपूर खान लवकरच आई होणार असून आपल्या दुस-या बाळाला जन्म देणार आहे. तिच्या या गोड बातमीने कपूर आणि पतौडी कुटूंबात आनंदाचे वातावरण आहे.