करीना कपूरच्या या चॅलेंजिंग योग क्रिया बघून चाहत्यांना फुटला घाम, तुम्ही करु शकता का हे?
Kareena Kapoor Fitness (Photo Credits: Instagram)

बॉलिवूड हॉट अभिनेत्री करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) जितकी दिसायला सुंदर आहे तितकीच ती आपल्या हॉट आणि फिट व्यक्तिमत्त्वामुळे सुद्धा लोकप्रिय आहे. करीनाचे फिटनेस फंडे आणि तिची स्टाईल नेहमीच तिचे चाहते फॉलो करत असतात. मात्र या मागे करीना ची मेहनतही वाखाणण्याजोगी आहे. आई बनल्यानंतरही तिने त्वरित आपल्या फिटनेसवर भर देण्यास सुरुवात केली. करीना स्वत:च्या फिटनेसवर जिममध्ये किती वेळ घालवते हे कोणापासूनच लपून राहिलेले नाही. त्यामुळे आई बनल्यानंतरही एवढी फिट राहणारी करीना तिच्या चाहत्यांसाठी आदर्श बनली आहे.

नुकतेच तिने आपल्या इन्स्टा अकाउंटवरुन अशा काही योगक्रिया (Yogasana) शेअर केल्या की ते पाहून तिचे लाखो चाहते आवाक झाले. तिने ह्या पोस्टमध्ये इतक्या चॅलेंजिंग योगप्रकार दाखवले आहेत की ते पाहून अनेक चाहते घायाळ झाले आहेत.

करीना कपूरचे थक्क करणारे योग प्रकार:

 

 

 

 

View this post on Instagram

 

 

 

#yogaitsamust🌺️❣️❣️

A post shared by Kareena Kapoor Khan (@therealkareenakapoor) on

या फोटोंमध्ये लोकांना फिटनेस गोल्स देत आहे यात काही वाद नाही. ब-याचदा महिलांचे आई बनल्यानंतर वजन वाढते. करीनाच्या बाबतीतही तसेच घडले होते. ती गरोदरपणात इतकी हेल्दी झाली होती की आता करीना काही बारीक होणार नाही असे तिच्या चाहत्यांना वाटले होते. मात्र करीनाने नियमित व्यायाम करुन पुन्हा एकदा स्वत:ला सिद्ध करुन दाखवले आहे.

 

View this post on Instagram

 

back in action!!!! With 50 suryanamaskars by the end of the class!!!! #yoga

A post shared by Kareena Kapoor Khan (@therealkareenakapoor) on

करीना जिम सोबत योग आणि पायलेट्स क्लासेसला सुद्धा जाते. आपल्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढून ते नियमित व्यायाम करण्यात कोणताही खंड पडू देत नाही, हे गोष्ट खरीच कौतुकास्पद आहे.

करीना कपूर राजकारणात एण्ट्री करण्याबाबत काय म्हणाली माहिती आहे?

करीना लवकरच अक्षय कुमार (Akshay Kumar) सोबत 'गुड न्यूज' (Good News)या चित्रपटात दिसणार आहे. यात कियारा अडवाणी आणि दिलजीत दोसांझ सुद्धा असणार आहेत. हा चित्रपट 27 डिसेंबर 2019 मध्ये प्रदर्शित होईल.