कोरोना विरुद्धच्या लढ्यात करण जोहर याच्या धर्मा प्रॉडक्शन ने PM Cares Fund, CM Relief Fund सह अनेक सेवाभावी संस्थांना दिले दान (Watch Video)
Karan Johar (Photo Credits: Instagram)

देशावर ओढावलेल्या कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटामुळे अनेक प्रकारचे नुकसान होत आहे. लॉकडाऊनमुळे अनेक उद्योगधंदे, व्यवसाय बंद असल्याने नागरिकांना त्रासाला समोरे जावे लागत आहे. तर रोजंदारी कामगारांचे प्रचंड हाल होत आहेत. या कठीण काळात मदतीसाठी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटीज पुढे सरसावले आहेत. त्यात आता अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक करण जोहर (Karan Johar) याची ही भर पडली आहे. करण जोहरने पीएम केअर्स फंडात (PM Cares Fund) आपले योगदान दिले होते. आता करण जोहरने धर्मा प्रॉडक्शन (Dharma Production) सह एकत्रितपणे कोरोना पासून सुरक्षित राहण्यासाठी एनजीओ ची साथ दिली आहे. (बिग बी अमिताभ बच्चन COVID-19 मुळे देशात निर्माण झालेल्या स्थितीमुळे गरजूंना रोज दान करत 2000 खाद्यपदार्थांचे पॅकेट)

यासंदर्भात करण जोहरने इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत करणने लिहिले की, "आपण सर्व एकत्र आहोत आणि आपल्याला कोरोना विरुद्ध लढण्याची गरज आहे. या कठीण काळात आपण एकत्रितपणे एकमेकांना मदत करणे हे आपले कर्तव्य आहे. याच कारणास्तव धर्मा परिवार लॉकडाऊनच्या या कठीण काळात गरजवंतांच्या मदतीसाठी पुढे आला आहे."

करण जोहर पोस्ट:

या व्हिडिओत कोरोनामुळे त्रासलेल्या लोकांचे हाल दाखवण्यात आले आहेत. त्यामुळे या काळात आपल्या सर्वांना एकत्रितपणे याचा सामना करायचा आहे. तसंच कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांना घरी सुरक्षित राहण्याचे आवाहनही त्याने व्हिडिओद्वारे केले आहे. त्याचबरोबर गरजूंच्या मदतीसाठी धर्मा प्रॉडक्शन सज्ज असल्याचेही त्याने सांगितले. यासाठी त्याने पीएम केयर्स फंडासह चीफ मिनिस्टर रिलीफ फंड, एनजीओ गूंज, जोमेटो फिडिंग इंडिया यांसारख्या सात संस्थांना दान दिले आहे.