Kangana Ranaut (Photo Credits: Twitter)

'मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी' (Manikarnika: The Queen of Jhansi) सिनेमात बॉलिवूड क्विन कंगना रनौत (Kangana Ranaut) हिने राणी लक्ष्मीबाईंची भूमिका वठवली होती. या सिनेमातील कंगनाची व्यक्तिरेखा आणि लूकची बाहुली बाजारात दाखल झाली आहे. 'मणिकर्णिका डॉल' (Manikarnika Doll) साडीत असून पारंपारिक आभूषणांनी सजलेली आहे. सिनेमातील कंगनाच्या लूकला साधर्म्य पावणारी ही बाहुली आहे. या बाहुलीचा फोटो कंगनाच्या टीमने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

मणिकर्णिका डॉल लहान मुलांची नवी आवड बनत आहे. आपल्या हिरोजबद्दल शिकत मुलं मोठी होत आहेत. यातून देशभक्ती आणि शूरता याची प्रेरणा मिळेल, ही खूप चांगली गोष्ट आहे. असा मेसेज लिहित या डॉलचा फोटो कंगनाच्या फोटोसह ट्विट करण्यात आला आहे. (पूजा भट्ट आणि कंगना रनौत यांच्यात नेपोटिज्मवरुन ट्विटरवॉर; सुशांत सिंह राजपूत आणि रिया चक्रवर्ती यांच्या नात्यामध्ये महेश भट्ट यांना इतका रस का? कंगनाचा थेट सवाल)

Team Kangana Ranaut Tweet:

'मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी' हा सिनेमा गेल्या वर्षी 25 जानेवारी रोजी प्रदर्शित झाला होता. यात कंगना रनौत प्रमुख भूमिकेत होती. विशेष म्हणजे कंगनाने दिग्दर्शित केलेला हा पहिला सिनेमा होता. याचाच अर्थ या सिनेमातून कंगनाने दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवले. तसंच या सिनेमानंतर तिने आपल्या प्रॉडक्शन हाऊसचे नावही मणिकर्णिका फिल्म्स असे ठेवले आहे.