नरेंद्र मोदी आणि कंगना रनौत (Photo Credits-Twitter)

बॉलिवुड मधील एक बिनधास्त नाव म्हणुन ओळखली जाणारी कंंगना रनौत (Kangana Ranaut)  आता राजकारणात वळण्याचा विचार करत असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु होती ज्यावर आता टीम कंंगना रनौत या अधिकृत अकाउंंट वरुन स्पष्टीकरण देण्यात आले आहे. कंंगना ची बाजु मांंडताना केलेल्या या ट्विट मध्ये म्हंंटलंय की," अनेकजण म्हणतात तुला राजकारणात यायचंंय म्हणुन मोदींंची वाहवा करतेस का? पण अशांंना मी इतकंच सांंगेन माझंं कुटुंंब राजकारणात फार आधी पासुन आहे. माझे आजोबा हे कॉंंग्रेस (Congress) मध्ये 15 वर्ष सक्रिय नेते होते, किंंबहुना मुळगावी माझ्या परिवाराचे राजकारणातील काम इतके प्रचलित आहे की गॅंगस्टर सिनेमा नंंतर जवळपास कॉंग्रेस कडुन दरवर्षीच मला निवडणुकीत तिकिट ऑफर केले जाते. इतकंच काय तर सुदैवाने मणिकर्णिका (Manikarnika) नंंतर मला भाजपने (BJP) सुद्धा तिकिट ऑफर केलं होतंं.

आजवर अनेक प्रसंगात आपण ही पाहिले असेल की कंंगना बर्‍याच वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या सरकारच्या निर्णयाचे समर्थन करत असते, पण निवडणुकीचं तिकिट ऑफर होत असलं तरी मी कलाकार म्हणुन माझ्या कामावर प्रेम करते, राजकारणाचा मी कधी विचार केलेला नाही तसेच कोणाला पाठिंंबा द्यायचा हा माझा वैयक्तिक मुद्दा आहे त्यासाठी मला ट्रोल करणार्‍यांना मी घाबरत नाही. जे पटतं त्याला मी पाठिंंबा देतेच अशी भुमिका कंंगनाने मांंडली आहे.

कंंगना रनौत ट्विट

दरम्यान, कंंगना ने राजकारणात सहभागी होण्याच्या चर्चा फार आधीपासुनच सुरु आहेत. 2019 सालच्या लोकसभा निवडणुकांंच्य वेळी सुद्धा या चर्चांंना उधाण आले होते.