कंगना रनौत व सीएम उद्धव ठाकरे (संग्रहित संपादित प्रतिमा)

अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) आणि महाराष्ट्र सरकार यांच्यामधील वाद चांगलाच चिघळला आहे. कंगना मुंबईत (Mumbai) दाखल होण्याआधीच बीएमसीने (BMC) तिच्या वांद्रे येथील पाली हिल येथे असलेल्या कार्यालयाला 24 तासांत दुसरी नोटीस पाठविली. यानंतर थोड्याच वेळात, बीएमसीची एक टीम बुलडोजर, क्रेन आणि हातोडा घेऊन या ठिकाणी पोहोचली आणि कार्यालयाचा काही भाग तोडण्यात आला. आता आज दुपारी कंगनाचे मुंबईमध्ये आगमन झाले आहे. त्यानंतर लगेचच तिने तिच्या कार्यालयाचा मोडलेला भाग, झालेले नुकसान यांचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले. त्यानंतर घडलेल्या घटनेबाबत आपले विचार व्यक्त करताना ती म्हणाली, 'आज माझे घर तुटले आहे, पण उद्धव ठाकरे उद्या तुझा अहंकार तुटेल'.

सध्या कंगनाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये कंगनाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray)  यांचा एकेरी उल्लेख केला आहे. आपल्या व्हिडीओमध्ये कंगना म्हणते, ‘उद्धव ठाकरे तुला काय वाटते, तू फिल्म माफियांशी हातमिळवणी करत माझ्या बाबतीत मोठा बदला घेतला आहे? आज माझे घर तुटले आहे, पण उद्धव ठाकरे उद्या तुझा घमंड मोडेल, ही वेळेची चाके आहेत, ती कधीच एकसारखी राहत नाहीत. मला असे वाटते की तु माझ्यावर खूप मोठे उपकार केले आहेत, कारण मला माहित होते की काश्मिरी पंडितांना कोणत्या परिस्थितीचा सामना करावा लागला होता, मात्र आज मी ते स्वतः अनुभवले.’ (हेही वाचा: हा लोकशाहीचा मृत्यु म्हणत कंंगना रनौत ने शेअर केले तोडफोड झालेल्या ऑफिस मधील Video, इथे पाहा)

पहा व्हिडीओ -

पुढे ती म्हणते, ‘आज मी या देशाला वचन देते की, मी फक्त अयोध्यावरच नाही, तर काश्मीरवरही एक चित्रपट बनवणार. याद्वारे मी माझ्या देशवासियांना जागे करणार. मला माहित होते असे काही होणार, मात्र हे माझ्या बाबतील घडले आहे. याला नक्कीच काहीतरी अर्थ आहे. उद्धव ठाकरे, ही जी क्रूरता आणि दहशतवाद माझ्या सोबत घडला ती चांगली गोष्ट आहे... जय हिंद, जय महाराष्ट्र’

तर अशा प्रकारे बीएमसीने आपल्या घराचा काही भाग तोडल्यानंतर कंगनाने त्याला प्रतुत्तर दिले आहे.