
बॉलिवूड अभिनेत्री कंगणा रानौत हिच्या हेअर ड्रेसरला लैगिंक अत्याचार केल्याप्रकरणी अटक केली आहे. एका अल्पवयीन मुलासोबत लैगिंक अत्याचार केल्याचा त्याच्यावर आरोप आहे.
ब्रॅडन आल्स्टर डिगी (42) असं या हेअर ड्रेसरचं नाव आहे. तो मुळचा दक्षिण आफ्रिकेचा आहे. ब्रॅडन गेल्या काही वर्षांपासून कंगणा रानौतचा हेअर ड्रेसर म्हणून काम करतो. रायगड येथे सिनेमाच्या सेटवरुन त्याला अटक करण्यात आली आहे. पॉक्सो कायद्याअंतर्गत ही अटक करण्यात आल्याचे खार पोलिस स्टेशनच्या सिनियर इंस्पेक्टरने सांगितले.
खार पोलिसांच्या माहितीनुसार, याप्रकरणातील आतापर्यंत 8 लोकांना अटक करण्यात आली आहे. ब्रॅटनला अटक केल्यानंतर त्याचा पासपोर्ट जप्त करण्यात आला.
मीडिया रिपोर्टनुसार, डेटिंग अॅपच्या माध्यमातून आरोपी ब्रॅडनची एका मुलासोबत ओळख झाली. पीडित मुलगा 18 वर्षांचा असून त्याच्या आईने गेल्या वर्षी ब्रॅडनविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पोलिसांनी त्याला कोर्टात सादर केले आणि आता त्याला 3 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कस्टडीत ठेवण्यात येणार आहे.