Kangana Ranaut ने बहिण रंगोलीसह 4 भावंडांना भेट म्हणून दिले 4 कोटींचे अलिशान फ्लॅट्स
Kangana Ranaut and Rangoli Chandel (Photo Credits: Instagram)

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) आजकाल बर्‍याच गोष्टींबद्दल चर्चेत आहे. कधी वादाबद्दल, तर कधी आपल्या चित्रपटांबद्दल ती नेहमीच प्रकाशझोतात राहते. आता पुन्हा एकदा अभिनेत्री चर्चेत आली आहे. पण यावेळी कारण काहीतरी वेगळेच आहे. कंगनाने तिच्या भावंडांना चंदीगडमध्ये (Chandigarh) आलिशान फ्लॅट्स भेट म्हणून दिले आहेत. यासाठी कंगनाने 4 कोटी रुपये खर्च केले आहेत. चंदिगडमध्ये कंगनाने आपली बहिणी रंगोली, भाऊ अक्षत आणि दोन चुलतभावांना लक्झरी फ्लॅट्स भेट म्हणून दिले आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कंगनाला आपल्या भावंडांची स्वप्ने पूर्ण करायची होती व त्यातील एक घराचे स्वप्न होते.

यावर कंगनानेही ट्विट केले आहे. तिने लिहिले की, ‘मी लोकांना त्यांच्या कुटुंबासाठी काहीतरी करण्यास प्रोत्साहित करू इच्छितो. लक्षात ठेवा शेअर करण्यानेच आनंद वाढतो. आत्ता फ्लॅट्स तयार होत आहेत आणि 2023 मध्ये तयार होतील. पण मी हे करू शकले याचा मला खूप आनंद आहे.’ सांगितले जात आहे की कंगनाने खरेदी केलेले फ्लॅट्स चंदीगड आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अगदी जवळ आहेत, यामुळे त्यांना प्रवास करणे देखील सुलभ होईल.

याआधी अनेक उदाहरणांवरून हे सिद्ध झाले आहे की कंगना तिची बहिण रंगोलीवर खूप प्रेम करते. आता पुन्हा एकदा कंगनाने तिचे प्रेम दाखवून दिले आहे. यावेळी फक्त फक्त रंगोलीच नाही तर इतर तीन भावंडांचाही कंगनाने विचार केला आहे. (हेही वाचा: Takht: करण जोहरचा महत्त्वाकांक्षी-मल्टीस्टारर चित्रपट 'तख्त'वर लागली रोख? रणवीर सिंह, आलिया भट्ट, करीना कपूर खान, अनिल कपूर साकारणार होते भूमिका)

दरम्यान, यावर्षी कंगनाचा पुढचा चित्रपट 'थलाइवी' रिलीज होईल ज्यामध्ये ती जयललिता यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय ती 'तेजस'मध्ये भारतीय वायुसेनेची लढाऊ पायलट आणि 'धाकड'मध्ये एक गुप्त सेवा एजंट म्हणून दिसणार आहे. या व्यतिरिक्त तिने नुकताच मणिकर्णिकाचा सिक्वल 'मणिकर्णिका रिटर्न्स: द लीजेंड ऑफ दिद्दा' बनवण्याचीही घोषणा केली आहे.