kaise Hua Song (Photo Credits: YouTube)

शाहिद कपूर (Shahid Kapoor) आणि कियारा आडवाणी (Kiara Advani) यांची प्रमुख भूमिका असलेल्या कबीर सिंह (Kabir Singh) या चित्रपटाची गाणी सध्या प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय होतायत. त्यामुळे या चित्रपटाची उत्सुकता देखील शिगेला पोहोचली आहे. नुकतेच ह्या चित्रपटातील एक सुंदर असं रोमँटिक गाणे प्रदर्शित झाले आहे. 'कैसे हुआ' (Kaise Hua) असे या गाण्याचे बोल असून शाहिद कपूर आणि कियारा आडवाणी यांच्यावर हे गाणे चित्रित करण्यात आले आहे. याआधी कबीर सिंह या चित्रपटाचे 'तुझे कितना चाहने लगे' , 'बेख्याली'  आणि 'मेरे सोनेया' ही गाणी प्रदर्शित झाली आहे. किंबहुना अनेकांच्या प्लेलिस्ट वर देखील आली आहेत.

त्यातच आता रिलीज झालेले 'कैसे हुआ' हे गाणे ऐकल्यावर तुम्हाला तुमच्या पहिल्या प्रेमाची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. कारण जेव्हा कोणी प्रेमात पडत तेव्हा तो कळत नकळत आपल्यासाठी इतका महत्त्वाचा व्यक्ती कसा होता हे आपल्याला कळतच नाही. या गाण्यामध्ये असचं काहीसं गुलाबी प्रेम दाखवलयं शाहिद आणि कियाराने. पाहा ह्या  गाण्याचा व्हिडिओ:

कैसे हुआ गाणे:

विशाल मिश्रा याच्या आवाजात हे गाणे स्वरबद्ध करण्यात आले असून, मनोज मुंताशिर यांनी हे गाणे लिहिले आहे. शाहिद कपूरने सुद्धा आपल्या ट्विटर अकाउंटवरुन हे गाणे पोस्ट करुन त्याखाली'कबीर आणि प्रीति मध्ये प्रेम कसे झाले, हे पाहण्यासाठी हे गाणे नक्की पाहा' असे म्हटले आहे.

हा चित्रपट तेलुगु चित्रपट 'अर्जुन रेड्डी' चा रिमेक आहे. संदीप वांगा याने या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. दिल्ली. मसूरी आणि मुंबईमध्ये या चित्रपटाचे शूटिंग करण्यात आले आहे. हा चित्रपट 21 जूनला मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होईल. मात्र एकूणच चित्रपटाची प्रसिद्धी पाहता प्रेक्षक या चित्रपटाच्या प्रदर्शनाकडे डोळे लावून आहेत असे म्हणायला हरकत नाही.