'Kabir Singh' Movie Mere Sohneye Song:गुलाबी प्रेमाचा नवा रंग घेऊन आलय कबीर सिंह चित्रपटातील 'मेरे सोनेया' गाणे, तुम्ही ऐकलं का?
Kabir Singh movie Song (Photo Credits: YouTube)

दक्षिणेतील सुपरहिट चित्रपट 'अर्जुन रेड्डी' याचा हिंदी रिमेक असलेला 'कबीर सिंह' हा चित्रपट येत्या 21 जूनला आपल्या भेटीला येणार आहे. अभिनेता शाहिद कपूर आणि कियारा अडवाणी ह्या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. नुकत्याच रिलीज झालेल्या या चित्रपटाच्या ट्रेलरवरुन या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमधील उत्सुकता अजून शिगेला पोहोचली आहे. या चित्रपटातील गाणीही तितकीच लोकप्रिय होत आहे. आता या चित्रपटातील नवे गाणे 'मेरे सोनेया' प्रदर्शित झाले आहे.

हे गाणे सचेत टंडन आणि परंपरा ठाकूर यांनी गायले आहेत. इरशाद कमिल यांनी हे गाणे लिहिले असून सचेत आणि परंपरा हेच या गाण्याचे संगीतकार आहेत. हा चित्रपट ज्या दक्षिणेतील चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे त्या चित्रपटाच्या दिग्दर्शकांनीच म्हणजे संदीप रेड्डी यांनी कबीर सिंह चे दिग्दर्शन केले आहे.

Kabir Singh Official Trailer: वैद्यकिय शिक्षण, प्रेम-फसवणुक आणि नशेच्या धुंदीमधील शाहीद कपूरच्या कबीर सिंह चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित (Video)

शाहिद कपूर या चित्रपटातून एका वैद्यकिय विद्यार्थ्याची भुमिका साकारत आहे. प्रेमात यशस्वी न झालेल्या तरुणाची कथा यात दाखविण्यात आली आहे. तर शाहिदनेला एका मुलाखती दरम्यान असे सांगितले होते की, नशेच्या अवतारासाठी त्याादिवसाला 20 सिगरेट ओढाव्या लागायच्या. मात्र घरी जाण्यापूर्वी मी दोन तास अंघोळ करायचा असे सुद्धा शाहिदने सांगितले आहे.