
प्रसिद्ध गीतकार आणि पटकथा लेखक जावेद अख्तर (Javed Akhtar) हे आज 17 जानेवारीला आपला 75वा वाढदिवस साजरा करत आहेत. हा खास दिवस आणखीनच स्पेशल करण्यासाठी काल, शबाना आझमी (Shabana Azmi) यांच्या निवासस्थानी एक पार्टी आयोजित करण्यात आली होती. बॉलिवूडमध्ये दर दिवशी होणाऱ्या पार्ट्यांपेक्षा ही पार्टी वेगळी ठरण्याचे कारण म्हणजे यासाठी रेट्रो थीम (Retro Theme) ठेवण्यात आली होती. यावेळी स्वतः जावेद अख्तर, शबाना आझमी यांच्यासहित अनेक मोठे कलाकार रेट्रो लूक मध्ये पाहायला मिळाले. जावेद आणि शबाना यावेळी कलर कोऑर्डिनेट करून लाल रंगाच्या पोलका डॉट कपड्यात सर्वांच्या समोर आले होते. सोबतच या पार्टीसाठी फरहान अख्तर (Farhan Akhtar), गर्लफ्रेंड शिबानी दांडेकर (Shibani Dandekar) सहित उपस्थित होता. (फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर लवकरच अडकणार लग्नबंधनात?; जाणून घ्या Javed Akhtar यांची प्रतिक्रिया)
जावेद अख्तर यांच्या बर्थडे पार्टीचे काही खास फोटो पहा लेटेस्टली मराठी वर
जावेद अख्तर आणि शबाना आझमी

फरहान अख्तर याने अमिताभ बच्चन यांच्यासारखा लूक करता डोक्यावर गमछा बांधून एंट्री केली.

या पार्टीत अभिनेत्री दिव्या दत्ताने लाल रंगाचा शरारा घालून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.

बोनी कपूर यांनी देखील शर्ट आणि गळ्यात एक स्कार्फ असा साधा पण तरीही हटके दिसणारा लूक केला होता.

शाहरुखची पत्नी गौरी खान हिने शबाना आझमी यांच्यासारखा गळ्यात फुलांचा हार आणि पिवळ्या रंगाचे शेड्स घालून पार्टीला हजेरी लावली.

याशिवाय अनिल कपूर, आमिर खान, किरण राव, सतीश कौशिक, फराह खान, उर्मिला मातोंडकर, आशुतोष गोवारीकर सहित अनेक कलाकारांनी या पार्टीला आवर्जून हजेरी लावली होती.