Janhvi Kapoor Dance Video: 'कान्हा माने ना' गाण्यावर जान्हवी कपूर चे सुंदर नृत्य; पहा व्हायरल व्हिडिओ
Janhvi Kapoor (Photo Credits: Instagram)

बॉलिवूडची धडक गर्ल जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) सध्या सोशल मीडियावर खूप अॅक्टीव्ह आहे. ती सातत्याने सोशल मीडिया अकाऊंटवरुन आपले फोटोज आणि व्हिडिओज शेअर करुन चाहत्यांचे मनोरंजन करत असते. अलिकडेच तिने सोशल मीडियावर एक क्लासिकल डान्सचा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ सर्व चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. अलिकडेच जान्हवी कपूरने इंस्टाग्राम अकाऊंटवर 'जमुना के तट पर' या गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओने देखील सोशल मीडियावर धम्माल उडवली होती. त्यानंतर आता हा नवा डान्स व्हिडिओ चाहत्यांचे मनोरंजन करण्यास सज्ज झाला आहे.

हा व्हिडिओ जान्हवीने शेअर करत तिने लिहिले की, "आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ मस्त वाटेल." या व्हिडिओतील जान्हवीचे नृत्य, अदाकारी, हावभाव नक्कीच मन खिळवून ठेवतात. त्याचबरोबर या व्हिडिओत जान्हवी डान्स करताना तिची लहान बहिण खूशी कपूर समोर आरामात बसली आहे. जान्हवीच्या या व्हिडिओवर चाहत्यांकडून कमेंट्स चा वर्षाव होत आहे. (जान्हवी कपूर चा 'पीया तोसे नैना लागे' गाण्यावर बहारदार डान्स, Watch Video)

पहा डान्स  व्हिडिओ:

 

View this post on Instagram

 

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

जान्हवी कपूर करण जोहरच्या 'तख्त' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात जान्हवी सह रणवीर सिंह, करीना कपूर खान हे कलाकार देखील आहेत. याशिवाय 'दोस्ताना 2' मध्ये कार्तिक आर्यन सोबत जान्हवी कपूर झळकणार आहे. दरम्यान, सोशल मीडियावर जान्हवी कपूरचे प्रचंड फॅन फॉलोईंग असून जान्हवीच्या प्रत्येक पोस्टला भरभरुन प्रतिसाद मिळत असतो.